कल्याण : दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांच्या हातावर काठीने, लोखंडी सळईने फटका मारायचा. त्यांच्या हातामधील पिशवी, मोबाईल रेल्वे मार्गात पडला की तो उचलून पळून जायचा. अशा पध्दतीने आंबिवली रेल्वे मार्ग भागात प्रवाशांना लुटणाऱ्या एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. संदीप प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी तो हे उद्योग करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

आंबिवली रेल्वे मार्ग भागात धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या महिला, पुरुषांच्या हातावर फटका मारुन त्यांच्या हातामधील मोबाईल, पर्स रेल्वे मार्गात पाडण्याचे प्रमाण वाढले होते. ही वस्तू रेल्वे मार्गात पडली की चोरटे ती उचलून घेऊन जात होते. लोकल धावती असल्याने प्रवाशांना रेल्वे मार्गात उतरण्याची सोय नव्हती. या चोरीच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी वाढत होत्या.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif Ali Khan attack
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला नवं वळण; घरात आढळलेले बोटांचे ठसे आरोपीशी जुळत नाहीत
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

हेही वाचा…. अंबरनाथ: शेतकरी – एमआयडीसी वादात काटई कर्जत मार्गाची मार्गिका बंद

हेही वाचा…. कल्याणमध्ये मद्यपींकडून वाहनांची तोडफोड

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी रेल्वे पोलिसांना आंबिवली भागात गस्त ठेवण्यास सांगितले होते. या भागात अशाप्रकारच्या चोऱ्या करणाऱ्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. या कालावधीत चोरटा या भागात फिरकला नाही. परंतु, पोलिसांनी तांत्रिक माहिती, परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून संदीप प्रसाद याला अटक केली. त्यानेच लोकल प्रवाशांच्या हातावर काठी मारुन त्यांच्या हातामधील रेल्वे मार्गात पडलेल्या वस्तू उचलून चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने आतापर्यंत किती ठिकाणी हे प्रकार केले आहेत याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.

Story img Loader