कल्याण पूर्व भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर नववर्षाचे स्वागत आणि इतर उत्सवी कार्यक्रमांसाठी स्वागत कमानी राजकीय मंडळी, व्यावसायिकांनी लावल्या आहेत. या स्वागत कमानी रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. काही स्वागत कमानी उच्च वीज वाहक तारांच्या खाली आहेत. तिसगाव नाका, शिवाजी काॅलनी, नुतन ज्ञान मंदिर, कोळसेवाडी, जुनी जनता सहकारी बँक, म्हसोबा चौक भागात या कमानी लावण्यात आल्या आहेत. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत वाहनांची वर्दळ अधिक असल्याने या कमानी अनेक वेळा वाहतुकीला अडथळा ठरत आहे. मोठा अवजड ट्रक या रस्त्यावर जात असेल तर काही वेळा या कमानी ट्रकच्या छताला अडसर येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फलक, कमानींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन एक मंडप तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. तहसीलदारांनी स्थानिक पातळीवर या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पालिका प्रशासन, शासन अधिकाऱ्यांकडून केली जात नसल्याबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानासाठी वाॅर रुम; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती

रस्ते अडवून कमानी उभारल्या जात असताना स्थानिक प्रभागाचे साहाय्यक आयुक्त याविषयी मौन बाळगून बसत असल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न नागरिक करत आहेत. या कमानींविषयी अनेक तक्रारी रहिवाशांनी पालिकेत केल्या आहेत. कार्यक्रम, उत्सव संपल्यानंतर अनेक महिने या कमानी रस्त्यावरुन काढून घेण्यात येत आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी या कमानींवर कारवाई केली की व्यावसायिक, राजकीय मंडळी त्यांना फैलावर घेतात, असे समजते.

“ अग्निशमन, वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पाहूनच कमानी उभारण्यास परवानगी दिली आहे. वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पध्दतीने कमानी उभारु नका असे संबंधितांना सांगितले आहे. तरीही पाहणी करुन कमानी मागे घेण्यास सांगते.” -विता हिले , साहाय्यक आयुक्त , जे प्रभाग.

हेही वाचा: कल्याण: फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिका दाखल करणार फौजदारी गुन्हे

” संबंधित ठिकाणी कमानी उभारण्यास वाहतूक विभागाकडून कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही.” – रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.

कल्याण पूर्व भागात नेहमीच रस्ते अडवून जाहिराती, कमानी बांधणीस पालिका प्रशासन परवानी देते. या कमानी कार्यक्रम संपल्यानंतर काढल्या जात नाहीत. नागरिकांनी या फलकांच्या पालिकेत तक्रारी केल्या तर त्याची दखल घेतली जात नाही. वाहन कोंडीला या कमानी, जाहिरीत फलक अडथळा ठरतात.” -आनंद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते