सिगारेट आणि पैशांची मागणी करत गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणाऱ्या चोरटय़ाला पकडण्याच्या प्रयत्नात रणजितसिंग मंगलसिंग गिरासे (२१) या तरुणाला जीव गमवावा लागला. तर आणखी एकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना मुंब्रा येथील बाह्य़वळण मार्गावर शनिवारी रात्री घडली.
ठाणे येथील सावरकरनगर भागात रणजितसिंग, अक्षय आणि ओंकार हे तिघे राहातात. शनिवारी रात्री ते मोटारसायकलवरून बाह्य़वळण मार्गावरून जात असताना अक्षयला मळमळायला लागले. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल थांबविली असता, तिथे एका मोटारसायकलवरून तीन चोरटे आले.
त्यातील एकाने सिगारेट आणि पैशांची मागणी करत अक्षयच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यामुळे त्या तिघांपैकी एकाला रंजितने पकडले असता त्याने चाकूने हल्ला चढविला. यात रंजितचा मृत्यू झाला तर अक्षयवरही चाकूने हल्ला करण्यात आल्यामुळे जखमी झाला आहे.