ठाणे : शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे. आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. ईडी, सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले, ७० हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत, हे त्यांनी जाहीर करावे तसेच शहा यांनी इलेक्टोरल बाँड, सीबीआय यावरही कधीतरी बोलावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देत शहा यांना टोले लगावले. शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे. आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते, असा टोला त्यांनी लगावला. ईडी, सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले, ७० हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत, हे शहा यांनी जाहीर करावे, असेही त्यांनी म्हटले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
political journey Devendra Fadnavis, Mayor, Chief Minister
फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

हेही वाचा – डोंबिवलीत विवाहितेवर दोन भावांचा लैंगिक अत्याचार

शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही, हे अमित शहा यांनाही उमगले आहे. याच शहा यांनी इलेक्टोरल बाँड, सीबीआय यावरही कधीतरी बोलावे, असे आव्हानही आव्हाड यांनी यावेळी दिले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत. ते मानव हिताचे राजकारण करीत आले आहेत. पवारांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. पण, गेले दोन वर्षे या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या. त्यात यश आले नसल्यामु‌ळे त्यांनी आता हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

नागरिक सुरक्षित कसे राहणार?

रस्ता सुरक्षा नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे ८००-८०० पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन कसे होणार. असे असेल तर हीट अ‍ॅण्ड रन होणार नाही तर काय होणार. त्यातही पोलिसांना वरून गुन्हा दाखल करू नका, असे आदेश येणार, मग अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. हल्ली पीए, कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये, असे आदेश देत आहेत. पुणे, वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता. आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता. एकीकडे कोणाला एमपीडीए लावायचा, कुणाला तुरुंगात टाकायचे, यासाठी फोन केले जातात. चौकशी पारदर्शक होत नाही. गुन्हेगार वाचविले जातात. मग, काही होत नाही म्हणून मग्रुरी येते अन् गुन्हे वाढत जातात. हे थांबलं पाहिजे. पण, आता सरकारमधील मंत्रीच ठोकून काढण्याचे आदेश देत आहेत. म्हणजेच आता आम्हाला चिलखत, शिरस्त्राण, पॅड बांधूनच बाहेर पडावे लागणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच दोन महिन्यांनंतर व्यवस्था बदलणार आहे. या लोकांनी केलेली गद्दारी जनता मोडून काढणार आहे. जनता या लोकांना क्षमा करणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा – डोंबिवलीत कचोरे येथे अपंगासह त्याच्या बहिणींना बेदम मारहाण

हे कसले शिवभक्त? हे तर दरोडेखोर

विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी शासनाला खडे बोल सुनावले. स्थानिकांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापुरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली. विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता. आणि त्यांच्या नावाने दंगल पसरविली जात आहे. ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत, असेही त्यांनी म्हटले.

Story img Loader