लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली शहराच्या पूर्व, पश्चिम भागातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करताना रिक्षा, दुचाकी वाहने आपटत असल्याने बंद पडत आहेत. रिक्षा, दुचाकी स्वारांना खड्डेमय रस्त्यावरुन सतत येजा करुन पाठ, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

डोंबिवली, कल्याणमध्ये खडडे भरणीची कामे सुरूच आहेत, असा दावा शहर अभियंता, बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. तरीही ठेकेदाराकडून पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात टाळाटाळ केली जात आहे. पावसाळापूर्वीची खड्डे भरणीची कामे ठेकेदारांनी सुस्थितीत न केल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर सततच्या वाहन वर्दळीमुळे डोंबिवलीतील बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

हेही वाचा… शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा अजित पवार यांना पाठिंबा

खड्ड्यांमुळे वाहने हळू चालविली जात असल्याने शहरात वाहन कोंडी होत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरुन सतत येजा केल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना पाठ, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे. सतत खड्ड्यात रिक्षा आपटून रिक्षेचे भाग सुट्टे होत आहेत. रिक्षा प्रवासी वाहतूक करताना बंद पडते. त्याचा फटका आठवड्यातून दोन ते तीन वेळा रिक्षा चालकांना बसतो.

हेही वाचा… ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहशतवाद मुक्त; प्रदेश नेते प्रमोद हिंदुराव यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली पुलावरुन उजवे वळण घेऊन गणेशनगर भागाकडे जाताना पेट्रोल पंप रस्त्यावर खड्ड्यांच्या रांगोळ्या तयार झाल्या आहेत. ठाकुर्ली पूर्व भागातील बँक ऑफ महाराष्ट्र, हनुमान मंदिर रस्त्यावरील रस्त्याची चाळण झाली आहे. या अरुंद रस्त्यावरुन शाळेच्या बस, अवजड वाहने येजा करतात. त्यामुळे दुपार, संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. डोंबिवलीतून कल्याणला जाण्याचा हा मधला मार्ग आहे. वाहन चालक या रस्त्याला सर्वाधिक पसंती देतात. ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या पूर्व बाजुला उताराला मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्याखाली जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला गळती लागल्याने ते पाणी रस्त्यावर येते. या भागात मोठे खड्डे पडले आहेत. स. वा. जोशीच्या प्रवेशव्दार ते गणेशमंदिरापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

हेही वाचा… कल्याणजवळील म्हारळ येथे खदानीत तरुणाचा मृत्यू

जोशी, ब्लाॅसम शाळेतील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालक सकाळ, दुपार, संध्याकाळ याठिकाणी येतात. बहुतांशी पालक दुचाकीवरुन मुलांना घेऊन जातात. जोशी शाळेसमोरुन प्रवास करताना वाहन चालकांना खड्ड्यांमुळे कसरत करावी लागते. शाळांकडे जाणाऱ्या बहुतांशी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पालिकेने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही यादृष्टीने या रस्त्यांची तातडीने देखभाल करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढण्यापूर्वीच पालिकेने खड्डे पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजविले जातील यादृ्ष्टीने प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.