मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदर पूलावर मोठे भगदाड पडले आहे. गेल्यावर्षी याच मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित झाला होता. दरम्यान, मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी रस्त्याची दुरूस्ती होईपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी. अशी मागणी केली आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदर पूलावर दरवर्षी खड्डे पडत असतात. यावर्षीही हीच परिस्थिती झाली आहे. ठाण्याहून पनवेलच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील रेतीबंदर पूलावर मोठे भगदाड पडले आहे. भगदाडामुळे रस्त्यामधील संपूर्ण सळई देखील दिसून येत असून अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी या खड्ड्यामुळे येथील वाहतूक ऐकेरी पद्धतीने सुरू होती. त्यामुळे शिळफाटा येथील भांडार्ली पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनीही मार्गाची दुरुस्ती होईपर्यंत येथील अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी केली आहे. आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गाला भगदाड
गेल्यावर्षी याच मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित झाला होता.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2022 at 16:38 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a big hole on retibandar bridge on mumbra bypass amy