लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे: बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी लागू केलेल्या पाणी कपातीमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी कपात लागू केली आहे. या कपातीमुळे दर शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे जिल्ह्यातील शहरांना होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा गुरूवार, १५ जून रोजी रात्री १२ ते शुक्रवार, १६ जून रोजी रात्री १२ याकालावधीत बंद राहणार आहे.

हेही वाचा… ठाणे पालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापुर्वीच मिळाली पुस्तके; आयुक्तांच्या दट्यामुळेच हे घडल्याची चर्चा

या कालावधीत कळवा, वागळे इस्टेट भागातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २, नेहरुनगर, घोडबंदर येथील कोलशेत खालचा गाव, दिवा आणि मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळता) या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांची पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.