लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या निगा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा शुक्रवारी चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात.

हेही वाचा… कल्याणमधील प्राथमिक विद्यामंदिराला आदर्श शाळा पुरस्कार

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या निगा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहराचा जवळपास ३६५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते शनिवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ या कालावधीत हा शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भाग या परिसराचा समावेश आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader