महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा मुंब्य्रातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये बनावट वाहन क्रमांकावरील कारवाई, सरळमार्गी रिक्षा चालकांना पडते भारी
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत कळवा मुंब्य्रातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यात दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम. व्हॅली, अमृत नगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समिती मधील काही भाग व कोलशेत मधील काही परिसराचा समावेश आहे. या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.