कर्जासाठी बजाज फायनान्सच्या नावाने फसवणूक करणारे फसवणूक करणाऱ्या तीन जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. नमन संजय गुप्ता (२२, रा. जीवन पार्क, सिरजपूर, दिल्ली), आकाशकुमार सुनील चांदवानी (२८, जि. रोहिणी, दिल्ली), ऋषी दीपकुमार सिंग (२८, रा. मालकागंज चौक, दिल्ली) यांना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून सात लाख ३४ हजार, पाच मोबाईल, एटीएम कार्ड असा नऊ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
हेही वाचा- ठाणे : टिटवाळ्यात ५० हून चाळी, गाळे जमीनदोस्त; सरकारी, वन जमीनी हडप करण्याचा भूमाफियांचा डाव
नागरिकांची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. बँकेत ठेवलेले पैसेही सुरक्षित राहत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत या भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्यांनी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, पुणे, बिहार भागातील रहिवाशांना कर्जाच्या नावाने फसविले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले, अनिल आव्हाड हे त्यांना घरासाठी कर्ज घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये चौकशी करत होते. दोन महिन्यापूर्वी आव्हाड यांना आर. के. शर्मा इसमाचा फोन आला. मी बजाज फायनान्समधून बोलतोय तुमचे १० लाखाचे कर्ज मंजूर झाले आहे. विनाकटकट कर्ज मंजूर झाल्याने आव्हाड निश्चिंत झाले. कर्ज मंजुरीचे संदेश आव्हाड यांना येऊ लागले. शर्मा याने कर्ज मंजुरी झाल्याने प्रक्रिया शुल्कासाठी तुम्हाला ३० रुपये भरणा करावे लागतील. शषांक प्रसाद यांच्या कोटक महिंद्रा बँक खात्यावर तुम्हाला ते पाठवावे लागतील असे सांगितले. ती रक्कम भरणा केल्यानंतर, भामट्यांनी कर्ज २७ लाख मंजूर असल्याने तुम्हाला आणखी शुल्क भरणा करावे लागेल. ही रक्कम भरणा केली नाहीतर तुमची भरणा रक्कम बुडेल आणि कर्जही मिळणार नाही असा धाक आव्हाड यांना घालण्यास सुरुवात केली. प्रक्रिया शुल्काच्या नावाने दोन महिन्याच्या काळात भामट्यांनी आव्हाड यांच्याकडून सात लाख ३४ हजार रुपये उकळले.
हेही वाचा- ठाणे : लहान मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; एकास अटक
कर्ज कधी मिळणार असा प्रश्न केला आणखी एक लाख रुपये भरा, असे सांगितले जात होते. आपल्याशी बँक अधिकारी नव्हे तर भामटे बोलत आहेत. ते आपली फसवणूक करत आहेत हे लक्षात आल्यावर आव्हाड यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आव्हाड यांनी पैसा भरणा केलेली बँक खाती पहिले बंद करण्याचे बँकांना कळविले. ते खाते नमन संजय गुप्ता (रा.अमृतसर) याचे असल्याचे आढळले. तो शिमला येथे एका शय्यागृहात आढळला. त्याच्या साथीदारांना पोलिसांनी नोयडा, उत्तरप्रदेशमधून अटक केली. या आरोपींनी उत्तरप्रदेश, नोयडा मधील बँकांमध्ये बँक खाती उघडली आहेत. त्याव्दारे देशाच्या विविध भागातील नागरिकांची कर्ज देण्याच्या नावाने फसवणूक करत आहेत असे तपासात उघड झाले. आरोपींनी आतापर्यंत किती लोकांना फसविले आहे याचा तपास सुरू आहे.