लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याण : एक्सप्रेसमध्ये प्रवासी म्हणून प्रवास करून रात्रीच्या वेळेत प्रवासी झोपले की त्यांच्या जवळील पिशवीतून सोन्याचा ऐवज, किमती वस्तू चोरणाऱ्या एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. या इसमाकडून चोरीचा सात लाखाहून अधिक किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने अन्य दोन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. हा इसम मुंबईतील धारावी येथील रहिवासी आहे. शत्रुघ्न श्रीनवल शर्मा उर्फ छोटू (३७) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेली माहिती अशी की, गुजरात अहमदाबाद येथील फालगुनीबेन तुरखिया (७०) ही वृध्द महिला पंधरा दिवसापूर्वी वेरावल एक्सप्रेसने अहमदाबाद ते पुणे असा झोपुन प्रवास करत होत्या. त्यांच्याजवळ पिशव्या होत्या. पिशवीतील बटव्यात सोन्याचा ऐवज आणि किमती सामान होते. कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान झोपुन उठल्यावर त्यांना आपल्या पिशवीतील ९६ ग्रॅम सोन्याचा ऐवज गायब असल्याचे दिसले. त्यांनी डब्यात शोधाशोध केली पण बटवा आढळून आला नाही. आपण झोपी गेलो असताना चोरट्याने ऐवज चोरल्याचा संशय व्यक्त करून फालगुनीबेन यांनी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कल्याण लोहमार्ग आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
आणखी वाचा-कोल्ड प्ले निमित्त महामुंबईत सज्जतेची आखणी; कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येणारा दहा हजारहून अधिक वाहने
चोरट्याचा कोणताही थांगपत्ता नसताना चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी वसईरोड ते लोणावळा रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. या रेल्वे स्थानकांदरम्यान रात्रीच्या वेळेत साध्या वेशातून पोलिसांनी गस्त घातली. चोरट्याचा शोध लागत नव्हता. भिवंडी रेल्वे स्थानकात गुन्हे शाखेच्या पोलिसांची गस्त सुरू असताना रात्रीच्या वेळेत एक इसम संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळळला. एवढ्या रात्री रेल्वे स्थानकात काय करतो, अशी विचारणा पोलिसांनी त्यांना केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याची चौकशी कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी तो चोरटा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांना त्यांनी आपण वेरावल एक्सप्रेसमध्ये एक महिलेच्या बटव्यातील सोन्याच्या ऐवजाची चोरी केल्याची कबुली दिली. आणखी दोन पिशवी चोरीच्या गुन्ह्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा सात लाख २५ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला. या चोरट्याने मेल, एक्सप्रेसमध्ये आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार हितेश नाईक, अजय रौंधळ, स्मिता वसावे, वैभव जाधव, राम जाधव, रुपेश निकम, महेंद्र कार्डिले, रवींद्र ठाकुर, अक्षय चव्हाण यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.