लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या, लुटमार करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतील चार लाखांच्या मोबाईल चोरी प्रकरणात मंगळवारी अटक केली. हे सराईत चोरटे डोंबिवली पूर्व भागातील देसलेपाडा भागात वास्तव्याला होते.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

या दोन्ही चोरट्यांच्या अटकेने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक घरफोड्या उघड होण्याची शक्यता रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी व्यक्त केली. फिरोज उर्फ बाटला उर्फ राहुल मुन्ना खान (२५, रा. श्री समर्थ कृपा सर्व्हिस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व), सागर श्याम पारखे (२३,रा. देसलेपाडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा… येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडिधगा सुरूच!, वनमंत्र्यांच्या आदेशांना ‘वाटाण्याच्या अक्षता’

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील उर्सेकरवाडी मधील प्रिया मोबाईल दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार तोडून चोरट्यांनी गुरुवारी रात्रीच्या वेळेत चार लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरुन नेले होते. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही चोरी कैद झाली होती. दुकान मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, उपनिरीक्षक केशव हासगुळे, हवालदार सुनील भणगे, सचिन भालेराव, शिवाजी राठोड, हनमंत कोळेकर, विशाल वाघ, तुळशीराम लोखंडे यांची विशेष पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १२ तासाच्या आत आरोपींना अटक केली.

हेही वाचा… नस्ती गायब प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

त्यांच्याकडून चोरीच्या मोबाईल मधील दोन लाख ३७ हजाराचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. उर्वरित ऐवजाचा तपास सुरू आहे. या दोन्ही आरोपींची पोलिसांनी चौकशी केल्यावर ते मुंबई, ठाणे परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सराईत चोरटे डोंबिवली परिसरातील बेकायदा सर्व्हिस सेंटर, बेकायदा चाळीमध्ये आसरा घेऊन चोरीचे धंदे करत असल्याचे या चोरीतून स्पष्ट झाले आहे.