लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याण: भिवंडी शहराच्या विविध भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेले चोरटे कल्याण रेल्वे स्थानकात दिवसा, रात्री येऊन प्रवाशांचे मोबाईल, पैशाचे बटवे चोरुन नेत असल्याचे कल्याण लोहमार्गांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने अटक केली. हे दोन्ही चोरटे भिवंडी येथील झोपडपट्ट्यांमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरज कुमार जब्बर मोरया (१९, रा. मेट्रो हाॅटेलजवळ, बिलाल सेटचा गाळा, भिवंडी, मूळ राहणार, हरगाव, उत्तरप्रदेश), समीर नसरुद्दीन खान बाई (२४, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भिवंडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा… डोंबिवलीत रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे वाहने बंद पडणे, कंबर, पाठ दुखीचे आजार
पोलिसांनी सांगितले, बिहार येथे राहणारा धीरजकुमार पीतिझिया हा कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी बिहार येथे जाणारी एक्सप्रेस पकडण्यासाठी संध्याकाळी सात वाजता आला होता. एक्सप्रेस येण्यासाठी उशीर असल्याने धीरज कुमारला बसल्या जागी डुलकी लागली. त्याच्या खिशात मोबाईल होता. यावेळी चोरट्याने त्याच्या झोपेचा गैरफायदा घेऊन त्याच्या विजारीच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तो पळून गेला. जागे झाल्यावर धीरजकुमार यांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.
हेही वाचा… शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा अजित पवार यांना पाठिंबा
या तक्रारीनंतर शुक्रवारी संध्याकाळी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे राहणारा अल्पवयीन कष्टकरी पुणे येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात संध्याकाळच्या वेळेत आला होता. एक्सप्रेसला उशीर असल्याने तो कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांच्या बाजुला झोपला होता. या कालावधीत भुरट्या चोराने त्याच्या खिशातील मोबाईल काढून पळ काढला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. त्याने मोबाईल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात केली.
पोलिसांनी दोन्ही घटनांचा एकाचवेळी तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना आरोपी भिवंडी येथील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपी सुरज मोरया, समीर खानबाई यांना अटक केली. त्यांनी कल्याण परिसरातील रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.