लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ढोकाळी येथील मनोरमानगर भागात एका रिक्षा चालकाच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी चोरट्याने खेचून नेल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात रिक्षा चालक ओमप्रकाश पाटील हे राहतात. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते एका प्रवाशाला घेऊन मनोरमानगर येथे आले होते. मनोरमानगर येथे प्रवासी उतरला. त्यानंतर ओमप्रकाश यांना तहान लागली. त्यामुळे ते रिक्षातून बाहेर उभे राहून पाणी पित होते. त्याचवेळी एक तरूण त्याठिकाणी आला. त्याने ओमप्रकाश यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्याला पकडण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता, त्याने नागरिकांना धमकावले. त्यानंतर चोरटा तेथून पळून केला.
आणखी वाचा-ठाण्यात मारहाण करून तरूणाजवळील ऐवज लुटला
ओमप्रकाश यांनी १०० क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी आले. पंरतु चोर आढळून आला नाही. ओमप्रकाश यांच्या मानेला देखील दुखापत झाली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.