ठाणे : विवाहासाठी घेतलेल्या साड्या, कपडे घेऊन चोरटे पसार झाल्याचा प्रकार भिवंडीतील काल्हेर भागात उघडकीस आला आहे.१२ लाखाहून अधिक रुपयांचे हे वस्त्र आहेत. या चोरी प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई भागात राहणाऱ्या व्यवसायिकाच्या मुलीचा विवाह ठरला होता. त्यामुळे त्यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी विवाहासाठी लागणारे कपडे खरेदी केले होते. यामध्ये ७ लाख ७० हजार रुपयांचा एकूण ६५ साड्या, सुमारे दीड लाख रुपये किमतीचे २२ ड्रेस तसेच उर्वरित इतर कपडे होते. या कपड्यांची एकूण किमंत १२ लाखाहून अधिक आहे. संबंधित व्यवसायिकाने ते कपडे त्याच्या वाहन चालकाकडे सोपवून त्यांच्या काल्हेर येथील घरामध्ये ठेवण्यास सांगितले. चालकाने हे सर्व कपडे त्या घरामध्ये ठेवले. तसेच घराला कूलूप लावले. काही दिवसांपूर्वी चालक त्या घरामध्ये पाहणी करण्यासाठी गेला असता, बाहेरील कूलूप तुटलेल्या अवस्थेत होते. तसेच घरामध्ये ठेवलेले कपडे देखील चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी चालकाने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves spread with sarees worth lakhs of rupees taken for marriage amy
Show comments