नियमित पोलिओ लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिली मात्रा तसेच १४ आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरी मात्रा अशा एकूण दोन मात्रा देण्यात येतात. या बरोबरच आता नऊ महिने पूर्ण झालेल्या बालकाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ जानेवारी पासून पोलिओ प्रतिबंधात्मक (एफ – आयपीव्ही) लशीची तिसरी मात्रा देण्यात येणार आहे. पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे आणि प्रतिकार शक्ती वाढविणे या उद्देशाने हे लसीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>३१ डिसेंबरपूर्वीच ठाणे पोलिसांची ऑलआऊट मोहीम; अवघ्या चार तासांत १६६ जणांना अटक
पोलिओचा प्रसार थांबावा यासाठी शासनातर्फे अनेक जनजागृतीच्या उपायोजना राबविण्यात येतात. तसेच घरोघरी जात बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक औषधही देण्यात येते. नियमित पोलिओ लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिली मात्रा तसेच १४ आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरी मात्रा अशा एकूण दोन मात्रा देण्यात येतात. तर पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे आणि प्रतिकार शक्ती वाढविणे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांनुसार १ जानेवारी २०२३ पासून पोलिओ प्रतिबंधात्मक (एफ – आयपीव्ही) लशीची तिसरी मात्रा देण्यात येणार आहे. पोलिओ प्रतिबंधात्मक लशीची हि तिसरी मात्रा वयाची नऊ महिने पूर्ण झालेल्या बालकांना देण्यात येणार आहे. तसेच ही लस गोवर रुबेला प्रतिबंधात्मक लशीच्या पहिल्या मात्रेबरोबर देण्यात येणार आहे. तर सर्व पालकांनी याबाबत दक्ष राहून पाल्याचे लसीकरण करावे असे जिल्हा आरोग्य विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.