दोन दिवसांचे तान्हुले बाळ वसई रेल्वे स्थानकात सोडून पळ काढणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बुरखाधारी महिला आणि तिच्या सोबत असणाऱ्या तरुणाने हे बाळ फलाटावर ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या चित्रणाच्या आधारे वसई रोड रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
बुधवारी दुपारी वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर दोन दिवसांचे तान्हुले बाळ आढळून आले होते. या बाळाची नाळही कापलेली नव्हती. वसई रेल्वे पोलिसांनी बाळाला सोडून जाणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास पथक तयार केले आहे. रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला आणि पुरुष बाळाला सोडून गेल्याचे दिसून येत आहे. आम्ही सर्व स्थानकाचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्याआधारे क्रम जोडून हा निष्कर्ष काढला आहे. यातील तरुणाच्या हातात पिशवी असून बुरखाधारी महिलेने बाळाला चादरीत गुंडाळले होते, असे वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले.
परिसरातील सर्व प्रसूतिगृह, रुग्णालय आदी ठिकाणी पोलीस तपास करत आहेत. बाळाला न्यायालयाच्या आदेशानंतर नेरुळ येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या आश्रमात ठेवण्यात आले आहे. महिलेने बुरखा घातल्याने तिची ओळख पटत नाही. परंतु तिच्या सोबतच्या तरुणाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. त्यावरून पोलीस खबऱ्यांमार्फतही
तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader