लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार संविधानाच्या चौकटीत पूर्णपणे प्रयत्नशील आहे. राज्यात लागू असलेले ६२ टक्के आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे यादृष्टीने प्रयत्न सुरू असताना, काही जण टोकाची भूमिका घेऊन मुंबईत आरक्षणाच्या विषयावर मुंबईत येण्याची भाषा करतात. यामधून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे मनोज जरांगे पाटील यांना दिला.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
minister gulabrao patil Devendra Fadnavis Aditya Thackeray jalgaon
देवेंद्र फडणवीस योग्य वेळी आदित्य ठाकरेंना शिक्षा देतील – गुलाबराव पाटील यांचा दावा
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री

ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण मेळावा कल्याण जवळील वरप गावी रविवारी आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. संविधानाप्रमाणे देशाचा कारभार चालतो. संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. सध्या ६२ टक्के आरक्षण आहे. इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, जमाती सह ५२ टक्के आरक्षण आहे. १० टक्के आरक्षण आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. हे आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे, ही सरकारची भूमिका आहे. मात्र, काही जण टोकाची भूमिका घेऊन मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे देश चालतो. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.

आणखी वाचा-…तर आरक्षणाबाबत हट्ट करून चालणार नाही; अजित पवार

विकासाच्या विषयावर चर्चा करण्याऐवजी काही वाचाळवीर अलीकडे अनावश्यक मुद्दे उपस्थित करून समाजात तेढ निर्माण करत आहेत,अशी टीका पवार यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. असे वाचाळवीर राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वाचाळवीरांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वयाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. वय वाढते त्याप्रमाणे सरकारी कर्मचारी निवृत्त होत जातात. प्रत्येक जण निवृत्तीचे नियोजन करतो. आम्ही मात्र वय ८४ झाले तरी निवृत्त होण्यास, थांबण्यास तयारच नाहीत. एवढा हट्टीपणा आमचे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजप सोबत आम्ही गेलो, असे समर्थन अजित पवार यांनी केले.

आणखी वाचा-ठाणे : बंदूक स्वच्छ करताना गोळी झाडली गेल्याने तिघे जखमी; वागळे इस्टेट येथील घटना

मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. राज्याचे हित आणि सामान्यांचे कल्याण हाच विचार समोर ठेऊन राज्य सरकार कार्यरत आहे. येत्या काळात ठाणे जिल्ह्यातील विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, प्रदेश नेते प्रमोद हिंदुराव, भरत गोंधळे, नजीब मुल्ला, सोनिया धामी, युवक नेते पार्थ पवार, सूरज चव्हाण उपस्थित होते.

Story img Loader