ठाणे: राॅयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शानू बेरीवाल (३१), रजत शर्मा (३०) आणि विजय देवगन (४०) अशी अटकेत असलेल्या सट्टेबाजांची नावे असून तिघेही छत्तीसगडमधील आहेत. एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून ते सट्टेबाजी करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भिवंडी येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी येथील कोनगाव परिसरातील एका हाॅटेलमधून पोलिसांनी शानू, रजत आणि विजय या तिघांना ताब्यात घेतले. हे तिघेही आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद संघाच्या सामन्यांवर सट्टेबाजी केली. त्यासाठी त्यांनी इतर सट्टेबाजांकडून ११ लाख ८६ हजार ८११ रुपये किंमतीचे बेटिंग स्वीकारल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ मोबाईल, टॅब आणि लॅपटाॅप जप्त केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. त्यांनी यापूर्वी किती सामन्यावर सट्टा लावला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.