ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेले हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण या तीन नगरसेवकांना मंगळवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामिनासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊन बुधवारी या नगरसेवकांची  सुटका होण्याची शक्यता आहे.

परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला होता.

Story img Loader