ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच दिवसात तीन ठिकाणी मीटरला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तापमान वाढल्यामुळे विजेच्या उपकरणांवर होणारा ताण वाढला असून, त्याचा परिणाम अशा घटनांवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे महावितरणाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेचे आठ अग्निशमन केंद्रे आणि ९८ अग्निशामक वाहने कार्यरत आहेत. असे असले तरी शहरात विविध कारणांमुळे आग लागण्याच्या घटना समोर येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यात मोठमोठ्या गृहसंकुलांचा, हॉटेल्सचा आणि बिझनेस हब्सचा विकास झाल्यामुळे वीजेचा वापर वाढला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. तापमान वाढल्याने घरातील पंखे, एसी, कुलर अशा विद्युत उपकरणांचा वापर अधिक होत आहे, ज्यामुळे मीटरला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

या वाढत्या वापरामुळे तांत्रिक बिघाड, जुन्या पद्धतीच्या वायर, तसेच वायरची कमी क्षमता आणि मीटरवर भार वाढणे अशा विविध कारणांमुळे मीटरला आग लागल्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे. बुधवारी दिवसभरात वागळे इस्टेट परिसरात २ ठिकाणी तर मानपाडा येथील एका ठिकाणी मीटरला आग लागल्याच्या घटना घडली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात रात्री १२ ते १ च्या दरम्यान द-ठाणे क्लबच्या मीटर रूममध्ये आग लागली. यामध्ये दोन मीटर जळून खराब झाले आहेत. त्याचप्रमाणे, वागळे इस्टेटच्या तुळजा भवानी चौकातील महावितरणच्या विद्युत डीपी मधील वायरला तांत्रिक कारणांमुळे आग लागली. आणखी एका घटनेत मानपाडा येथील सहा मजली इमारतीच्या तळमजल्यावर मीटरला आग लागली. यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील वीज पुरवठा खंडित केला होता.