ठाणे : कोपरी येथील मीठबंदर भागात सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप मोहीते (४६), यश मोहीते (१६) आणि निधी मोहीते (१२) अशी जखमींची नावे आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीठबंदर येथे सुमारे ३५ वर्ष जुनी श्रमदान ही चार मजली शासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण २० सदनिका असून १० ते १२ सदनिकांमध्ये खांबांना तडे गेले आहे. तसेच प्लास्टरही निखळले आहे. त्यामुळे ही इमारत राहण्यासाठी धोकादायक झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इमारतीतील एका सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळले. या घटनेत प्रदीप, यश आणि निधी हे तिघेही जखमी झाले.

हेही वाचा…ठाणे : सिमेंट मिक्सर वाहन पलटी होऊन अपघात; एक ठार, सहा जखमी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.