वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २८ भागात बंदूक स्वच्छ करत असताना गोळी झाडली गेल्याने बंदूकधारकासह तिघेजण जखमी झाले. मोहम्मद शेख (५०), विपीन जयस्वाल (२१) आणि राहुल जयस्वाल (२३) अशी जखमींची नावे आहेत. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रोड क्रमांक २८ भागातील राम नगर परिसरात चामुंडा फॅब्रिडकेटर्स नावाची कंपनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ठाण्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त होणार, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना

ही कपंनीचे मालक मोहम्मद शेख असून त्यांच्या कंपनीत विपीन आणि राहुल कामगार आहेत. शनिवारी रात्री कंपनीमध्ये मोहम्मद हे बंदुक स्वच्छ करत होते. त्यावेळी मोहम्मद यांच्याकडून चुकून गोळी झाडली गेली. ही विपीन आणि राहुल यांच्या हाताला लागली. तर, मोहम्मद यांच्या तळहाताला दुखापत झाली. घटनेची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्यासह श्रीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद याच्याकडे बंदूकीचा परवाना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.