ऐरोली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ मंगळवारी पहाटे १६ वर्षीय मुलावर तीन जणांनी चाकू हल्ला करून त्याचा मोबाईल खेचून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>> ठाणे : बोगस शपथपत्राप्रकरणात मुख्य सुत्रधाराचा शोध घ्यावा ; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची मागणी
ऐरोली रेल्वे स्थानकात पहाटे तीन वाजेच्या सुमारास तरुण तिकीट काढण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तीन जण त्याच्याजवळ आले. त्यांनी तरुणाचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. तरुण प्रतिकार करत असताना एकाने त्याच्या कमरेजवळ चाकू हल्ला करत त्याचा मोबाईल काढून घेतला. याघटनेत तरुण जखमी झाला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.