कल्याण – कल्याण जवळील मुरबाड रस्त्यावरील कांबा गाव हद्दीत बुधवारी दुपारी वीज पडून दगडाच्या खदानीत काम करणाऱ्या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या कामगारांना तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ति रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजन समयलाल यादव (२२, रा. मध्यप्रदेश), बंधनाराम मुंधा (२९, रा. झारखंड) असे वीज पडून ठार झालेल्या मजुरांची नावे आहेत. बुधवारी दुपारी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरू होता. या कालावधीत राजन, बंधनाराम हे मजुर कांबा येथील दगड खदानीत खोदकाम सयंत्राने खडकाला छिद्र पाडून त्यामध्ये विस्फोटके भरून खडकाचे स्फोटाच्या साहाय्याने तुकडे करण्याच्या कामात व्यग्र होते.

हेही वाचा >>>अपहृत मुलाची १२ तासांत सुटका, अंबरनाथ पोलिसांची कामगिरी; दहा आरोपी अटकेत

या खदानीच्या बाजुला एकसंध खडक फोडण्यासाठी लागणारी विस्फोटके होती. याचवेळी दुपारी विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होता. दोन्ही मजुरांचे काम सुरू असताना विजेचा जोरदार कडकडाट होऊन वीज मजूर राजन यादव, बंधनाराम यांच्या अंगावर पडली. ते दोघे जागीच ठार झाले. आजुबाजुच्या मजुरांनी त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ति रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच ते मृत झाले होते. टिटवाळा पोलीस ठाण्यात या मृत्युप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान बुधवारी दुपारी मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे परशु पवार(४२) या शेतकऱ्याच्या घरावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला