लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याणमध्ये एका गोदामातून चोरलेले महागडे आयफोन ग्राहकांना बनावट पावत्या देऊन विक्री करणाऱ्या दोन आयफोन मोबाईल विक्रेत्यांसह एक चोरट्याला येथील बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे उल्हासनगरमधील आहेत.

दीपक चंचलानी, कमल हरचंदानी अशी घाऊक आयफोन मोबाईल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची नावे आहेत. फैय्याज शेख चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेत लालचौकी भागात फ्लिपकार्ड या कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या कार्यालयातून काही दिवसापूर्वी महागडे आयफोन चोरीला गेले होते. बाजारपेठ पोलीस ठाण्यात फ्लिपकार्ड कंपनीकडून तक्रार करण्यात आली होती.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री साताऱ्याचा कशाला? माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

तांत्रिक माहितीच्या आधारे चोकशी करता पोलिसांना चोरीचे आयफोन काही ग्राहक वापरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या जवळील आयफोनची माहिती घेतली. त्यांनी हे मोबाईल उल्हासनगर मधील दुकानातून खरेदी केल्याचे आणि खरेदीचा पावती मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकाराने पोलीस चक्रावून गेले.

पोलिसांनी फ्लिपकार्डच्या गोदामातून आयफोन चोरणाऱ्या फैय्याज शेख या चोरट्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे त्याने हे चोरीचे मोबाईल उल्हासनगरमधील ममता मोबाईल शॉपच्या दुकानदारांना विकले असल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही दुकानमालकांना अटक केली. या तपासातून पोलिसांनी चार आयफोनचा तपास लावला आहे. उर्वरित मोबाईल शोधण्याचे काम सुरू आहे. या मोबाईल विक्रेत्यांनी अशाप्रकारचे किती ग्राहकांना बनावट पध्दतीने मोबाईल विक्री केले आहेत त्याचा तपास पोलीस करत आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people from ulhasnagar who sold stolen iphones to customers arrested in kalyan mrj