ठाणे: कळवा येथील मनिषानगर भागातील विक्रांत/४३ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने व पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेला रूम बंद करण्यात आला असून, संपुर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “रस्ता आमच्या मालकीचा”, डोंबिवली रेल्वे स्थानकावर रिक्षा चालकांचा उर्मटपणा

विक्रांत/४३ ही तळ+०३ मजली इमारत असून ती ३८ वर्षे जुनी इमारत आहे.  तळमजल्यावरती एकूण ६ दुकाने व ०२ सदनिका आहेत. पहिला मजल्यावरती एकूण ६ सदनिका आहेत. दुसऱ्या मजल्यावर ती एकूण ६ सदनिका आहेत. तिसऱ्या मजल्यावर ती एकूण ६ सदनिका आहेत.या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक-१०६ मध्ये  गणेश जानू धामणे हे राहतात. त्यांच्या सदनिकेचा स्लॅब तळ मल्यावरती असलेल्या हरून सलमानी हकीम यांच्या  मे. ग्लोबल ब्युटी सलूनवर पडला. या अपघातात आयुष जानू धामने(२०), कादिर सलमानी ( १९) आणि पार्थ निलेश पाटेकर (१६) हे तिघे जखमी झाले आहेत.

हेही वाचा >>> ठाणे: चोरट्यांकडून एकाची पाचव्या मजल्यावरून धक्का देऊन हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

आयुष हा विक्रांत/४३ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील १०६ क्रमांकाच्या सदनिकेत राहत असून त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर, याच सदनिकेचा खाली असलेल्या सलुनच्या दुकानात  कादिर हा काम करतो. त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.  पार्थ पाटेकर हा सलूनमध्ये केस कापण्यासाठी आला होता. त्याच्या डोळ्याला व पाठीला दुखापत झाली आहे. या सर्व जखमी व्यक्तींना उपचारासाठी प्रमिला हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका उपायुक्त, अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानुसार या इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने व पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेल्या सदनिका बंद करण्यात आली असून, संपुर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर सदनिका खाली करण्याचे आदेश उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three persons injured in collapse building slab in kalva municipal order vacate flats building ysh