डोंबिवली – येथील पूर्व भागातील आयरेगाव मध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक तीन माळ्याची धोकादायक इमारत कोसळली. या इमारतीत एक महिला अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी संध्याकाळी आयरे गावातील लक्ष्मण रेषा इमारती जवळील आदिनारायण भुवन ही चार माळ्याची इमारत कोसळली. ही इमारत अनधिकृत आणि धोकादायक असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत.

हेही वाचा >>> निर्माल्यासाठी कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम; डोंबिवली विमेन्स सोसायटीचा पुढाकार

ही इमारत लोड बेरिंग पद्धतीने बांधण्यात आली आहे. पालिकेने ही इमारत यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. या घटनेची माहिती मिळतात पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावाचे कार्य सुरू केले. पलिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे, ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी तातडीने इमारत दुर्घटना ठिकाणी भेट दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three story dangerous building collapsed in ayaregaon in dombivli zws