कल्याण- डोंबिवली, कल्याण शहराच्या वेगळ्या भागात तीन वेगळ्या घटनांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये एका १७ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा समावेश आहे. वाहने चालविणाऱ्यावरुन, भांडण सोडविताना झालेल्या वादातून ही मारहाण या विद्यार्थ्यांना झाली आहे.मानपाडा, बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितले, जितू निवृत्ती म्हात्रे (१८) हा महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तो डोंबिवली पश्चिमेत सम्राट हाॅटेल भागात राहतो. गुरुवारी रात्री आठ वाजता जितू म्हात्रे आणि त्याचा मित्र आदित्य वेजारे कारमधून डोंबिवली एमआयडीसी भागात फिरत होते. ओंकार शाळेजवळील कावेरी चौकातून जात असताना त्यांना समोरुन आलेल्या कार चालकाने वाहन बाजुला घेण्यासाठी इशारा लाईट(डिप्पर) दिला. त्यावेळी जितू बसलेल्या कारमधील चालक वेजारे यानेही समोरील चालकाला इशारा लाईट दिला.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले

हेही वाचा >>>डोंबिवलीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

समोरील कार चालकाला त्याचा राग आला. त्याने पुढे जाऊन कार थांबविली. त्याने वेजारे याच्या कारजवळ येऊन जितू बसलेल्या बाजुचा दरवाजाचा उघडून जितूला मोटारीतून खाली उतरविले. त्याला तेथे बेदम मारहाण करुन स्वताच्या वाहनात बसवून खंबाळपाडा येथील कार्यालयात नेले. तेथे आरोपी सौरभ श्याम शेलार आणि त्याच्या तीन साथीदारांनी जितूला काठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन गंभीर दुखापत केली. अपहरण करुन नेलेल्या जितूची सुटका करण्यासाठी चालक वेजारे, विशाल भानुशाली खंबाळपाडा येथे गेले. आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.

हेही वाचा >>>कसारा येथे तरुण -तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जितूला गंभीर दुखापत झाल्याने तो शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत आहे. मानपाडा पोलिसांनी जितू म्हात्रेच्या तक्रारीवरुन सौरभ शेलार व इतर तीन जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत, कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रस्त्यावरुन कुमार सुरेवाड (२६) हा मोटारीने चालला होता. त्याची कार अचानक बंद पडली. मागून येणारी कार समोरील बंद पडलेल्या कारला धडकली. सुरेवाडच्या कारमुळे आमच्या कारला अपघात झाला. त्यामुळे त्या कारमधील दोन जणांनी सुरेवाडला बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील चार हजार जबरदस्तीने काढुन घेतले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा >>>कळवा रुग्णालयाऐवजी जितो संस्थेला अधिक महत्त्व, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा आरोप

एक अल्पवयीन विद्यार्थी आपल्या नातेवाईका बरोबर कल्याण पश्चिमेतील फडके मैदाना जवळून चालले होते. तेथे पिंपळासचा रहिवासी नयन पाटील याचे अनोळखी इसमावर बरोबर भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थी मध्ये पडला. त्याचा राग येऊन नयनने अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण केली. नयनने चाव्या ठेवण्याच्या साखळीचा फटका विद्यार्थ्याच्या कपाळावर मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.