कल्याण – जैवविविधतेला धोका निर्माण करणारा तीन टन मांगुर मासा भिवंडी जवळील कुंभारशीव गाव हद्दीतील तलावांमधून मंगळवारी नष्ट करण्यात आला. वन विभागाच्या जागेत हे मांगुर मासा पालन सुरू असताना वन विभागाकडून कोणतीही आक्रमक कारवाई या मांगुर संवर्धकांवर करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मांगुर मासा पालनावर शासनाची बंदी आहे. हा मासा जैवविविधता नष्ट करतो. तलावातील जिवाणू नष्ट करतो. अनेक महिने तो पाण्याशिवाय राहू शकतो. सर्वाेच्च न्यायालयाने या माशावर बंदी आणून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. या माशाची मागील काही वर्षापासून भिवंडी, मुरबाड भागात वन विभागाच्या जागेत चोरून संवर्धन केले जाते. हा मासा काळ्या बाजारात चढ्या किमतीला विकला जातो.
कुंभारशीव गाव हद्दीतील वनपट्ट्यातील पाच तलावांमध्ये मांगुर माशांचे संवर्धन सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे आली होती.

Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Kalyan Dombivli hawker removal chief suspended
कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित
Offense against municipal employee refusing to sign Panchnama
पिंपरी : पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देणार्‍या महापालिका कर्मचार्‍यावर गुन्हा
dead lizard found in spice packet
Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Vasai, school children safety, school van checking in vasai, Badlapur sexual abuse case, transport department, school buses, safety measures, regional transport campaign
शालेय बसेसची परिवहन विभागाकडून तपासणी सुरू, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई
Vasai Virar, Mira Bhayandar, minor girls, molestation, sexual assault, POCSO, police cases, Nalasopara, Naigaon, Mira Road, Bhayandar
अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाचे सत्र सुरूच, वसई-विरार आणि मिरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात पोक्सो अंतर्गत ४ गुन्हे दाखल

हेही वाचा – ठाणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

वरिष्ठांच्या आदेशावरून ठाणे-पालघर मत्स्य विभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश पाटील, मत्स्य अधिकारी अमोल सोनोने, कुणाली तांडेल, मंडळ अधिकारी संतोष अगिवले यांनी कुंभारशिव येथील वनपट्ट्यात येऊन तेथील पाच तलावांमधील मांगुर मासा संवर्धकांना तातडीने मांगुर मासे नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी कार्यवाही केली नाही. हे तलाव वनपट्टा जागेत आहेत.

हे संवर्धन सलाउद्दीन मंडल याच्यावतीने आलमगीर मंडल, युनुसअली गाझी, अब्दुल कयुम (रा. पश्चिम बंगाल) हे करत होते. मत्स्य अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने पाचही तलावांमधील एकूण तीन टन मांगुर मासा बाहेर काढला. त्यांच्यावर ब्लिचिंग पावडर टाकून त्यांना एक खोल खड्ड्यात पुरण्यात आले. जैवविविधतेला धोका निर्माण करणारे मासे पालन केल्याने, वनपट्टा शर्तभंग केल्याप्रकरणी चार मांगुर संवर्धकांवर पडघा पोलीस ठाण्यात मत्स्य अधिकारी दिनेश पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा – ठाण्यातील धुळ नियंत्रण यंत्रणा अखेर कार्यान्वित

मागील तीन वर्षांपासून भिवंडी जवळील सामाजिक कार्यकर्ते दिनेश बेलकरे हेही या मांगुर उत्पादकांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून यापूर्वी मत्स्य अधिकाऱ्यांनी भिवंडी परिसरातील मांगुर संवर्धकांचे साठे नष्ट केले आहेत.