लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: शोभेचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन एका महिला व्यावसायिकाला तीन भुरट्या महिलांनी एक लाख २३ हजाराला लुटले. खरेदीदार महिला दुकानातून निघून गेल्यावर व्यावसायिक महिलेच्या हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

कल्याण पूर्वेतील शिवाजीनगर कोळसेवाडी भागातील प्राजक्ता कॉस्मेटिक या दुकानात गेल्या दोन आठवड्यापूर्वी दुपारच्या वेळेत हा प्रकार घडला. एक ४५ वर्ष, एक १३ वर्ष आणि एक चार वर्षाची मुलगी अशी आरोपी महिलांची ओळख आहे. प्राजक्ता अभिषेक पवार असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

आणखी वाचा-मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करण्यापेक्षा राज ठाकरेंनी नेत्यांची भेट घ्यावी

पोलिसांनी सांगितले, प्राजक्ता यांचे कोळसेवाडी भागात कॉस्मेटिकचे दुकान आहे. दोन आठवड्यापूर्वी त्यांच्या दुकानात तीन महिला दुपारच्या वेळेत शोभेचे दागिने खरेदी करण्यासाठी आल्या. वेगळ्या प्रकारचे दागिने बघण्यास घेऊन या महिलांनी तक्रारदार प्राजक्ता यांना बोलविण्यात गुंतविले. यावेळी हातचलाखी करुन प्राजक्ता यांची नजर चुकवून दुकानातील गल्ल्याजवळ ठेवलेली एक काळ्या रंगाची पिशवी एका भुरट्या महिलेने चोरुन आपल्या ताब्यात घेतली. या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम होती.

आणखी वाचा-ठाणे: टोल दरवाढविरोधात मनसेचे साखळी आंदोलन

या महिला शोभेचे दागिने बघून गेल्यानंतर प्राजक्ता यांच्या दुकानात गल्ल्याजवळ ठेवलेली पिशवी गायब असल्याचे दिसले. त्यांनी दुकानात शोध घेतला. घरी चौकशी केली. त्यावेळी कोठेही पिशवी आढळून आली नाही. दुकानात आलेल्या तीन महिलांनीच ही पिशवी चोरुन नेल्याचा संशय व्यक्त करुन प्राजक्ता यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. हवालदार एम. एस. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.