कल्याण : लाडकी बहीण योजनेचा अर्ज अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळींनी स्वत:च्या पक्षीय कार्यालयात भरून घेतले. या माध्यमातून महिलांचा मोबाइल संपर्क क्रमांक, घरचा पत्ता अशी माहिती हाती असल्याने त्याचा वापर आता प्रमुख पक्षांनी प्रचारासाठी सुरू केला आहे. या योजनेची माहिती सांगणारे दूरध्वनी वेळी-अवेळी खणाणू लागल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योजनेसाठी दिलेली माहिती तुम्ही निवडणूक प्रचारासाठी का वापरता, असे प्रश्न महिलांनी उमेदवार प्रचारासाठी संपर्क करणाऱ्या प्रचारकांना विचारला आहे. दिवसा कधीही फोन खणाणत आहेत. त्यावर राज्याच्या प्रमुखांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका महिलांना ऐकवली जात आहे. त्यात लाडकी बहीण योजनेतील महिलांना झालेल्या लाभाचे गोडवे गायले जात आहेत, असे काही महिलांनी सांगितले.

हेही वाचा…निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज

u

कामावर जाण्याची गडबड, घरगुती कामातील व्यग्र असताना मोबाइलवर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेली माहिती प्रचारासाठी ऐकवली जात आहे. अशा शब्दांत एका महिलेने नाराजी व्यक्त केली. वैयक्तिक संपर्क माध्यमावर प्रचार करणे योग्य नाही, असे एका महिलेने सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक महिलांना लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान खनिकर्म योजनेतील घरघंटी, शिलाई यंत्रासाठी पात्र करण्यात आले. काही राजकीय पक्षांशी संबंधितांना सर्वाधिक लाभ झाल्याची चर्चा आहे. खऱ्या लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचा राग राजकीय मंडळींवर आहे. अनेक महिलांनी अर्ज भरूनही त्यांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. या महिलाही नाराज आहेत. अशा महिलांच्या मोबाइलवरही उमेदवारांचा प्रचार ऐकावा लागत आहे. यासाठी काही महिलांनी असे मोबाइल क्रमांक कायमचे बंद करून टाकले आहेत.

हेही वाचा…शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर

राज्याच्या प्रमुखांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका ऐकवली जात आहे. त्यात लाडकी बहीण योजनेतील महिलांना झालेल्या लाभाचे गोडवे गायले जात आहेत. राजकीय पक्ष कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आमच्या मोबाइलवर दिवसभर संपर्क साधत आहेत. शासकीय योजनेसाठी दिलेल्या महिलांच्या मोबाइलचा उमेदवारांच्या प्रचारासाठी वापर करण्यात येऊ नये. हे दूरध्वनी वेळीअवेळी केले जात आहेत. -चैत्राली बोऱ्हाडे, रहिवासी, कल्याण</p>

राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना आमचे वैयक्तिक मोबाइल क्रमांक कुठून मिळाले, असे विचारल्यास त्याची उत्तरे कोणीही देत नाही. या अशा प्रचाराचा त्रास आम्ही का सहन करायचा? – दीपा शेळके, रहिवासी डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Through ladki bahin yojana parties are using womens contact details for campaigning sud 02