कोपरी येथील अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश प्रशासनास दिले. मागील काही महिन्यांपासून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रार येथील नागरिक करत होते. त्यामुळे शनिवारी त्यांनी अचानक याठिकाणी भेट दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणात महापालिकेच्या  कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांना समज देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Tunisha Sharma Suicide: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी FIR मधून मोठा खुलासा, “१५ दिवसांपूर्वीच…”

कोपरी येथील अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. कार्यकारी अभियंत्यांनी खुलासा करताना सांगितले की, ठेकेदाराने परस्पर काम सुरू केले असून त्या कामाचे देयक अदा करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर शनिवारी आयुक्त बांगर यांनी अचानक  भेट देऊन कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात कामाचा दर्जा निकृष्ट  करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर  हे काम करणाऱ्या ठेकेदाराचा समावेश काळ्या यादीत करण्यासंदर्भात अहवाल  सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. तसेच याप्रकरणी  कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांना समज देण्यात आली. ठेकेदाराने परस्पर काम सुरू केले तरी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. त्यामुळे कंत्राटदाराने परस्पर काम केले हा अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. याबाबत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकल्याचा कार्यकारी अभियंत्यांचा अहवाल  प्राप्त झाल्यानंतर संबधितांचा खुलासा मागवून पुढील कार्यवाही करण्यात आली.

कोपरी येथील गणेश विसर्जन घाटाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी काही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये शिल्पांवर प्रकाश योजना करणे,  घाटातून बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूस परिसरात कचरा टाकला जातो. ते पूर्णतः बंद करावे. एम्पिथिअटर, उद्यान आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता, निगा राखली जाईल यासाठी येथे एक सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच कोपरी परिसरात उभारण्यात येणारे सभागृह व खाडी किनारी सुशोभिकरण प्रकल्पाचे उर्वरीत काम एक महिन्याच्या आत पुर्ण करा, तसेच येथे असणारे निर्माल्य कलश अस्ताव्यस्त असून ते तातडीने सुस्थितीत ठेवण्यात यावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा >>> ठाणे रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्रेत्यांवरील कारवाई थांबणार

साकेत येथील खाडी किनारी सुशोभिकरण प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान तेथील उद्यानातील जॉगिंग ट्रॅकच्या कोपऱ्यांची कामे सुयोग्य पध्दतीने झालेली नाहीत. ती सुयोग्य करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्यानात बैठक व्यवस्थेत वाढ करुन गझिबोंची रचना करावी. जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी यावेत यासाठीलहान मुलांची खेळणी, ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी  अशा सुचनाही आयुक्तांनी केली. कळवा खाडी किनारी सुशोभिकरण प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या. पूलाच्या निर्माणासाठी वापरण्यात आलेले काही साहित्य पुलावर पडून आहे. ते हटविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पूलाच्या खांबांना रंगरंगोटी करण्यात यावी, दगडी आसन व्यवस्थेच्या कामामध्ये भेगा असून त्या भरण्यात यावे. तसेच येथे बनविण्यात आलेल्या उद्यान परिसरात मुलांना खेळण्याची जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, पुलाच्या खांबावर जाहिराती लावण्यात आल्याचे निदर्शनास येताच त्याची दखल घेत  पुलाच्या खांबावर जाहिराती लावणा-यांवर कारवाई करा असे निर्देश सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना दिले.