ठाणे : राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या २८२ रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या कालावधी थांबविण्यात आली होती. पावसाळा संपताच हि कामे पुन्हा हाती घेण्यात आली आहेत. येत्या १५ डिसेंबरपर्यंत ही कामे पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

ठाणे शहर खड्डेमुक्त व्हावे आणि ठाणेकरांना चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, या उद्देशातून ठाणे महापालिकेने शहरातील रस्त्यांची कामे हाती घेतली होती. या कामांसाठी राज्य सरकारने ६०५ कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला असून त्यातून २८२ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. त्यात, विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे केली जात आहेत. ही कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या मोसमात, जुलै महिन्यापासून ही कामे थांबविण्यात आली होती. आता ती कामे पुन्हा सुरू झालेली आहेत. या रस्त्यांची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्तअभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
Palghar Police conducts special awareness campaign on the occasion of Road Safety Week
शहरबात: रस्ते आणि सुरक्षा
traffic issues western express highway news in marathi
पश्चिम दृतगती मार्गाचे काँक्रिटिकरण अशक्य; वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे केवळ पुनःपृष्टीकरण करणार
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Thane Municipal Corporation refuses permission to dig roads to install CCTV cameras in Thane
ठाण्यात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी रस्त्यांची खोदाई?
Citizens are suffering due to excavation work on the roads of Chandrapur city
अमृत ठरतेय विष…चंद्रपूर शहराच्या रस्त्यांवरील खोदकामांमुळे…

हेही वाचा >>> कंटेनर बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी

जी कामे अपूर्ण आहेत, ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरू करायची आहेत, ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर असेल. सर्व अपूर्ण आणि नवीन कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. त्यात, प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामे शक्य नसतील तर त्याची सयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरू आहेत, असे होता कामा नये. कमीत कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आयुक्त बांगर म्हणाले. कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील, त्यावर पर्याय शोधावा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढून घ्या. कोणत्याही स्थितीत १५ डिसेंबरनंतर ही कामे प्रलंबित राहू नयेत, असेही त्यांनी सांगितले. स्त्यांची नवीन कामे सुरू करताना काही ठिकाणी वाहतूक वळवावी लागेल. अशा ठिकाणी नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल, याची दक्षता अभियंत्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.

रस्त्यांची प्रभाग समितीनिहाय माहिती सादर करा

पावसाळ्यापूर्वी सुरू किंवा पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही रस्त्यांची पावसाळ्यात दुरुस्ती करावी लागली असेल तर अशा रस्त्यांची प्रभाग समितीनिहाय माहिती सादर करावी. त्यात, रस्त्यांची नावे, लांबी, मालकी, दोष दायित्व कालावधी अशी माहिती द्यावी. त्यातून त्या रस्त्यांचे पुढील पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे शक्य होईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

Story img Loader