हॉटेल संघटनेचे कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

ठाणे : ब्रम्हांड येथील सागर गोल्डन हील टॉप या हॉटेल मालकाच्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा याच हॉटेलमध्ये दुसऱ्या एका तरूणाने सोमवारी सायंकाळी एका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला. मारहाण करणारा तरूण महापालिकेतील कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याच्या अटकेची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती. याप्रकारामुळे संतापलेल्या हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> टिटवाळ्यात रिक्षाचालकाने केली पत्नीची हत्या

ब्रम्हांड भागात संतोष शेट्टी यांचे सागर गोल्डन हील टॉप नावाचे उपाहारगृह आहे. काही दिवसांपूर्वी तीन गुंड त्याठिकाणी आले होते. त्यांनी हॉटेलमध्ये जेवण उशीराने मिळाले म्हणून शेट्टी यांच्यासोबत वाद घालून हाॅटेलमधील कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला केला होता. या घटनेला तीन आठवडे उलटत असताना पुन्हा याच हॉटेलमधील कर्मचाऱ्याला एका तरूणाने मद्य पिऊन मारहाणीचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता. कासारवडली पोलिसांनी संबंधित तरूणाला ताब्यात घेतले आहे. तो महापालिकेतील एका विभागात काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.