ठाणे : पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील बस वाहतूक मार्गात मोठे बदल लागू करण्यात आले आहे. पूर्व स्थानकातून बोरिवली, नालासोपारा आणि रामनगर मार्गे वागळे आगार मार्गे जाणाऱ्या बसगाड्या आता पश्चिम रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तसेच आज, २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून हा बदल लागू होणार असून तो महिनाभर म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे.

हेही वाचा >>> कळवा रुग्णालयातील रुग्णांचे हाल ; वातानुकूलीत यंत्रणेतील बिघाडामुळे चार शस्त्रक्रीया विभाग बंद

या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पुल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपूलाच्या सिद्धार्थनगर ते विराज टॉवर दरम्यानच्या खांबांवर तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. २६ जुलै ते २४ ऑगस्ट या काळात हे काम केले जाणार आहे. या कामामुळे वाहतूक पोलिसांनी २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. या मार्गावरून ठाणे परिवहन सेवेच्या बोरिवली (मार्ग क्र. ६५ ), नालासोपारा  (मार्ग क्र. ६९ ) आणि रामनगर मार्गे वागळे आगार  (मार्ग क्र. १११ ) या बसगाड्या वाहतूक करतात. या बसगाड्या आता ठाणे पूर्वऐवजी पश्चिम स्थानाकातून सोडण्यात येणार आहे. परिवहन सेवेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Story img Loader