पूर्वा भालेकर
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या अकरा महिन्यांत ६ हजार ९७५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १२ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे परिवहन विभागाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली.

ठाणे शहरातील विविध मार्गांसह मुलुंड, बोरिवली, मिरा-भाईंदर अशा काही शहरांमध्ये ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्या धावतात. या बसगाड्यांमधून दिवसाला हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक मार्गाच्या अंतरानुसार तिकीट दर ठरलेले असतात. बसमधील वाहक प्रवाशांकडून भाडेदर आकारुन तिकीट देतात. परंतू, अनेकदा बसमध्ये गर्दी असल्यामुळे काही प्रवासी लबाडीने वाहकाची नजर चूकवून तिकीट काढत नाहीत. गेल्या वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. अशा प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील विविध बस थांब्यावर तिकीट तपासणी करणारेे अधिकारी उभे असलेले दिसतात. तर, अनेकदा तिकीट तपासणी करणारे अधिकारी बस मध्ये देखील चढतात. यांच्याकडून प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान एखादा प्रवासी विना तिकीट आढळून आल्यास त्यावर ताटकाळ दंडात्मक कारवाई केली जाते. त्या प्रवाशाकडून प्रवासी भाडेदरासह २०० रुपये दंड आकारण्यात येतो. गेल्या अकरा महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६ हजार ९७५ प्रवाशांवर ठाणे परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या प्रवाशांकडून ६८ हजार ५८४ रुपये भाडेदर वसूली करण्यात आली आहे. तर, १२ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे ठाणे परिवहन विभागाकडून आलेल्या अहवालातून समोर आले आहे.

nagpur sub capital citizens are increasingly preferring electric vehicles
नागपुरकरांची इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती… तीन वर्षांत दुचाकी, चारचाकी…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Accidents increase Maharashtra ranking third in road accident victims
रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
akola action against pending vehicle fine special campaign for penalty recovery implemented
अकोला : सावधान! ४.८१ लाख वाहनांवर तब्बल २३.७८ कोटी थकीत, फौजदारी कारवाई…
NMMT changed one route from Juhu village on Vashi Koparkhairane due to heavy traffic
प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय
Central Railway will run additional unreserved special trains between Amravati CSMT Adilabad and Dadar
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जायचंय्? मग ‘हे’ वाचाच…
Work on third and fourth railway lines at Kalyan Ambernath and Badlapur stations gained momentum
तिसऱ्या चौथ्या मार्गिकेतील महत्वाच्या टप्प्याला गती, मार्गिकेतील लहान मोठ्या पुलांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर
Mumbai fine of rupees 107 crores
विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशावर कारवाईचा बडगा, मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर २ वर्षांत १०७ कोटींचा दंड

हेही वाचा…स्थानक परिसरात बेकायदा फलकबाजी

u

प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करु नये असे वारंवार आवाहन करण्यात येते तरी देखील काही प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. असे प्रवासी आढळून आल्यास त्यांच्या ताटकाळ दंडात्मक कारवाई केली जाते.भालचंद्र बेहेरे, वाहतूक व्यवस्थापक, ठाणे परिवहन विभाग

महिना प्रवासी संख्या दंड वसू

जानेवारी ७८१ ८२, ३००
फेब्रुवारी ७०८ ७४,६००

मार्च ७८६ ८३,७००
एप्रिल ५७५ १,१८,६००

मे ६१७ १,२८,७००
जून ५४९ १,१५,१००

जुलै ५२९ १,१०,६००

सप्टेंबर ६०० १,२३,२००
ऑक्टोबर ६३६ १,३०,८००

नोव्हेंबर ५५० १,१५,०००
एकूण ६,९७५ १२,१४,५००

Story img Loader