ठाणे : महापालिका परिवहन उपक्रमाचा यंदाच्या वर्षीचा म्हणजेच २०२४-२५ या वर्षाकरीता ६९४ कोटी ५६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन प्रशासनाने गुरुवारी समितीच्या बैठकीत सादर केला आहे. यामध्ये डबल डेकर बसगाड्या खरेदीचे प्रस्तावित करण्यात आले आहे. डिजिटल तिकीट सुविधा आणि पर्यावरणपुरक विद्युत बस खरेदीवर भर देण्याबरोबरच कोणतीही तिकीट दर वाढ करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर यंदाही ठाणे महापालिकेकडे ४५२ कोटी ४८ लाख इतक्या अनुदानाची मागणी करण्यात आली असून त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी काही पाऊले उचलली आहेत. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या दंडाच्या रक्कमेत वाढ करून ती शंभरवरून दोनशे रुपये इतकी करण्यात आली आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील ठाणे परिवहन उपक्रम मुख्यालय इमारतीत गुरुवारी परिवहन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी सभापती विलास जोशी यांच्याकडे यंदाच्या वर्षीचा म्हणजेच २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. २०२३-२४ या आर्थिक वर्षांकरिता ४८७ कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता आणि त्यात ३१० कोटींहून अधिक अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षीचा म्हणजेच २०२४-२५ या वर्षाकरीता ६९४ कोटी ५६ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यात ४५२ कोटी ४८ लाख इतक्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात आणि अनुदानाच्या रक्कमेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
247 best buses accidents reported in 3 years
तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
best initiative self owned buses gradually decreased leased buses increasing
भाडेतत्वावरील बसमुळे ‘बेस्ट’ धोक्यात; बसच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा – ठाणे: पदयात्रा मोर्चात २५ ते ३० आशास्वयंसेविकांना उष्मघाताचा त्रास

विद्युत बसगाड्या खरेदीवर भर

ठाणे महापालिका परिवहनच्या ताफ्यात ४३४ बसगाड्या आहेत. यामध्ये पर्यावरणपुरक विद्युत बसगाड्यांची संख्या ११४ इतकी आहे. परिवहन उपक्रमाला केंद्र शासनाच्या स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून परिवहन उपक्रमाने १२३ विद्युत बसगाड्यांची खरेदी केली असून त्यापैकी ११४ बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तर, उर्वरित ९ बसगाड्या येत्या काही महिन्यांत दाखल होणार आहेत. तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून यंदाच्या वर्षी ४२ आणि पुढील वर्षी ४४ तर, केंद्राच्या पीएम ई बस सेवा योजनेतून १०० अशा एकूण १८६ विद्युत बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे विद्युत बसगाड्यांची संख्या ३०९ इतकी होणार आहे. ठाणेकर प्रवाशांना डिजिटल तिकीट सुविधा सुरू करून देण्यात येणार आहे. १२३ बसगाड्यांसाठी कोपरी येथील कन्हैय्यानगर आगार विकसित करण्यात आला आहे. पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत येणाऱ्या १०० बसगाड्यांसाठी कोलशेत आगार आणि केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत येणाऱ्या ४२ बसगाड्यांसाठी कळवा आगार विकसित करण्याचे नियोजन आहे.

अनुदानाची मागणी

परिवहन उपक्रमाकडील बसगाड्यांचे आयुर्मान १० ते १२ वर्षे झाल्यामुळे बस नादुरुस्तीच्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पन्न घट आहे. त्यामुळे अत्यावश्यक खर्चाच्या बाबींकरीता तसेच परिवहन अधिकारी आणि कर्मचारी वेतन खर्चाची रक्कम पूर्णतः दरमहा अनुदान स्वरुपात देण्याकरिता ठाणे महापालिकेकडे ४५२ कोटी ४८ लाखांच्या अनुदानाची मागणी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

हेही वाचा – ठाण्यातील सेंट्रल पार्कचे नामकरण नमो सेंट्रल पार्क – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील आणि येत्या वर्षभरात दाखल होणाऱ्या विद्युत बसगाड्यांमधून १५८ कोटी ४० लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. परंतु यापेक्षा जीसीसी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या बसगाड्यांच्या संचलनाचा खर्च अधिक आहे. जीसीसी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या बसगाड्यांच्या संचलनापोटी २१४ कोटी ३६ लाख इतका खर्च येत आहे. यामध्ये जेएनएनयुआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या १९०, तेजस्वीनी ५० अशा २४० डिजेल इंधनावरील तर, परिवहनच्या ताफ्यात असलेल्या आणि वर्षभरात येणाऱ्या २६५ विद्युत बसगाड्यांचा समावेश आहे.

उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा या कार्यालयांशी समन्वय साधून ठाणे शहरामध्ये अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आळा घालण्याकरिता सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असून, त्याजोगे ठाणे परिवहन सेवेच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बस ताफ्यामध्ये मोठ्या संख्येने ‘मिडी’ बसेस घेऊन शहरी आणि ग्रामीण परिसरातील छोट्या रस्त्यांवर बस सेवा जिथे उपलब्ध नाही, असे मार्ग सेवा पाहणी करुन त्या मार्गावर बस फेऱ्यांचे नियोजन करुन जास्तीत-जास्त प्रवासी परिवहन सेवेकडे आकर्षित करण्याचे नियोजन आहे. ठाणेकरांनी खासगी वाहनांचा वापर करण्याऐवजी, परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांचा वापर करावा यासाठी डिजिटल माध्यमांतून जनतेला आवाहन करण्यात येईल, जेणेकरुन वाहतूक कोंडी कमी होऊन शहराचे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. परिवहन उपक्रमातील सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदाचा पदभार देऊन मार्ग तपासणी कार्यक्रमावर जास्तीत-जास्त भर देण्यात येत असून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Story img Loader