डोंबिवली : प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ठाणे महापालिका परिवहन विभागाने डोंंबिवलीतील बाजीप्रभू चौक ते दिवा पूर्व रेल्वे स्थानक बस सुरू केली आहे. आगासनमार्गे ही बस प्रवासी वाहतूक करत आहे. खासगी बस, रिक्षापेक्षा कमी दरात दिवा भागात पोहचता येत असल्याने या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… ठाण्यात आरोग्य व्यवस्थेचा विस्तार, शहरातील छोट्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढणार

हेही वाचा… पुनर्विलोकन यादीत निवृत्त, मयत कर्मचाऱ्यांचा समावेश, कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रकार

सकाळच्या वेळेत दुपारी १२ वाजेपर्यंत चार फेऱ्या आणि सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान चार फेऱ्या असे या बसचे नियोजन आहे. दिवा परिसराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमामात नागरिकरण झाले असून या भागात मध्यवर्गीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हे नागरिक डोंबिवली एमआयडीसी, निवासी विभाग, खासगी आस्थापना, खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये कामांसाठी अधिक संख्येने डोंबिवलीत येतात. या रहिवाशांना रेल्वेने दिवा स्थानकापर्यंत रिक्षाने येण्यासाठी १५ ते २० रूपये भाडे मोजावे लागते. पुन्हा डोंबिवलीत येऊन रेल्वे स्थानक ते इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांना तेवढीच रक्कम भाड्यासाठी खर्च करावी लागते. एवढी रक्कम दररोज खर्च करणे शक्य नसल्याने दिवा ते डोंबिवली बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी ठाणे परिवहन विभागाकडे केली होती. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ठाणे परिवहन विभागाने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बाजीप्रभू चौक ते दिवा पूर्व रेल्वे स्थानक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार ही बससेवा सुरू करण्यात आली असून त्यास प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmt started diva dombivli bus service asj