कळवा रुग्णालयात पालिकेचा जैव सीएनजी प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे शहरातील हॉटेल तसेच भाजीपाला बाजारातून जमा होणाऱ्या कचऱ्यातून जैव सीएनजी इंधनाची निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्याचा ठाणे महापालिकेचा प्रयत्न आता तडीस जाण्याची शक्यता आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातून दरवर्षी ६३० घनमीटर जैव सीएनजी इंधन निर्माण होणार आहे. हे इंधन महापालिकेला बाजारभावापेक्षा १२ टक्के स्वस्त दराने मिळणार असल्याने ते ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसमध्ये वापरण्याचा विचार प्रशासनाने चालवला आहे. तसे झाल्यास आर्थिक चणचणीमुळे रखडत चाललेल्या टीएमटीच्या बससेवेला मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या हेतूने महापालिकेने कचऱ्यातून इंधननिर्मितीचा प्रस्ताव आणला होता. शहरातील हॉटेल तसेच भाजीपाला बाजारात निर्माण होणारा कचरा एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून जैव सीएनजी इंधन निर्माण करण्याची पालिकेची योजना होती. त्याला आता मूर्त स्वरूप मिळू लागले आहे. या संदर्भात मंगळवारी करारनामे करण्यात आले. यापैकी जैव सीएनजीनिर्मिती प्रक्रियेतून वर्षांकाठी ६३० घनमीटर इंधन निर्माण होईल, असा दावा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला. हे इंधन वाहनांमध्येही वापरता येणार असल्याने परिवहन उपक्रमाच्या बसमध्ये त्याचा वापर करण्याचा विचार सुरू असल्याचेहीकळवा येथील प्रकल्पातून निर्माण होणारे हे इंधन महापालिकेला बाजारभावापेक्षा १२ टक्के कमी दराने मिळणार आहे. त्यामुळे पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. टीएमटीच्या ताफ्यात शंभरहून अधिक बस सीएनजी इंधनावर चालणाऱ्या आहेत. मात्र टीएमटीने गॅसपुरवठादार कंपनीचे पैसे थकवल्याने त्यांनी गॅसपुरवठा बंद केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता.

सीएनजी पंपांच्या माध्यमातून परिवहनच्या बसेसला गॅसपुरवठा केला जातो असून दिवसाला सुमारे सहा हजार किलो सीएनजी गॅस इंधन स्वरूपात परिवहन उपक्रमासाठी वापरले जाते. सध्या परिवहनच्या ताफ्यात जवळपास १०३ सीएनजी बसेस असून त्यापैकी ८० ते ९० बसेस रस्त्यावर धावतात.

या बसेसच्या इंधनाकरिता महिन्याकाठी सुमारे ८० ते ९० लाख रुपये खर्च येतो. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्याच प्रकल्पातून सीएनजी उपलब्ध झाल्यास परिवहन उपक्रमाची मोठी आर्थिक बचत होऊ शकणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.