लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील विजेवरील तसेच इतर वातानुकूलित बसगाड्यांचे तिकीट दर कमी करण्यासंबंधी परिवहन समितीने दिलेल्या प्रस्तावास प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे उद्या, शनिवारपासून वातानुकूलीत बसचे तिकीट दर निम्मे होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

ठाणे परिवहन उपक्रमामार्फत व्होल्व्हो वातानुकूलित बसगाड्या बोरीवली मार्गावर चालविण्यात येतात. या बसचे तिकटी दर २ किलोमीटर अंतरापर्यत २० रुपये इतके आहे. याच मार्गावर बेस्टचे तिकीट दर ६ रुपये तर एनएमएमटीचे तिकीट दर १० रुपये इतके आकारले जात होते. कमी तिकीट दरामुळे प्रवाशांचा बेस्ट किंवा एनएमएमटीच्या बसगाड्यांंकडे अधिक ओढा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता प्रवाशांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा- डोंबिवली: ठाकुर्लीत गटारात पाय घसरुन पडल्याने पादचारी जखमी

टीएमतीच्या वातानुकूलित बसगाड्यांचे कमीत कमीत कमी तिकीट २० रुपये तर जास्तीत जास्त तिकीट १०५ रुपये इतके होते. त्यात कपात करून कमी तिकीट दर १० रुपये तर, जास्तीत जास्त तिकीट ६५ रुपये इतके करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला होता. यासंबंधीचा प्रस्ताव समितीने तयार केला होता. त्यास प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. हे दर उद्या, शनिवारपासून लागू होणार आहेत. बसचे तिकीट दर निम्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पर्यावरणपुरक वीजेवरील १२३ पैकी ११ वातानुकूलीत बसगाड्या प्रवाशी सुविधेसाठी उपलब्ध झालेल्या असतानाच, वातानुकूलीत बसगाड्यांचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय परिवहन समिती तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार वातानुकूलीत बसचे कमीत कमी तिकीट दर १० रुपये तर, जास्तीत जास्त तिकीट ६५ रुपये इतके करण्यात आले आहे. यापुर्वी कमीत कमी तिकीट २० रुपये तर जास्तीत जास्त तिकीट १०५ रुपये इतके होते. बसचे तिकीट दर निम्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

असे असतील तिकीट दर

किलोमीटर पुर्वीचे दर सुधारीत दर
०-२ २० १०
२-४ २५ १२
४-६ ३० १५
६-८ ३५ १८
८-१० ४० २०
१०-१४ ५० २५
१४-१६ ५५ २५
१६-२० ६५ ३०
२०-२२ ७५ ३५
२२-२४ ७५ ४०
२४-२६ ८० ४५
२६-३० ८५ ५०
३०-३४ ९५ ५५
३४-३६ १०० ६०
३६-३८ १०५ ६०
३८-४० १०५ ६५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmts air conditioned bus ticket fares get less mrj