लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत स्वच्छ शौचालय अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातंर्गत ठाणे शहरातील ८२१ सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. हि कामे १५ जुलैपर्यत पुर्ण करण्यात यावीत आणि या कामांचेही त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करून घ्यावे, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना बुधवारी झालेल्या बैठकीत दिले. या कामात उणीवा किंवा काम निकृष्ट दर्जाचे आढळून आले तर, संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्याचबरोबर निकृष्ट दर्जाच्या कामाचे मोजमाप करुन देयक सादर केल्याचे निदर्शनास आले तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी बैठक घेऊन त्यात शौचालय कामांचा आढावा घेतला. या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले तसेच सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० टक्क्‌यांपेक्षा जास्त लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. येथे राहणाऱ्या बहुतांश नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. या शौचालयांची भौतिक स्थिती चांगली असणे आणि त्यांची स्वच्छता अत्युच्च दर्जाची असणे हे महापालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे. झोपडपट्टीतील सर्व शौचालय सुस्थितीत व आवश्यक सेवासुविधांनी युक्त असली पाहिजेत. कोणत्याही नागरिकाला असुविधेचा सामना करावा लागणार नाही या दृष्टीकोनातून अस्तित्वातील शौचालयाची दुरुस्ती आणि नुतनीकरण करण्यात येत आहे. हि कामे दर्जेदार पध्दतीने होतील यासाठी सर्व अभियंत्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सुचना बांगर यांनी बैठकीत केल्या. या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून नियोजित काम होत आहे की नाही यासाठी सातत्याने पाहणी करावी. तसेच या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करुन घेण्यात यावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

आणखी वाचा- ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने रहिवासी हैराण

शौचालयात बसविण्यात येणारे टाईल्स, भांडे, दरवाजे, कडी कोयंडे हे चांगल्या प्रतीचे बसविण्यात यावे, काही ठिकाणी नादुरूस्त असल्यास त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. तसेच स्थापत्य कामे उत्कृष्ट दर्जाची होतील या दृष्टीने आताच सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शौचालयात आवश्यक रंगरंगोटी करुन शौचालयाच्या परिसरात सुशोभित झाडांच्या कुंड्या ठेवण्यात याव्यात. शौचालये ही नागरिकांना वापरण्यास योग्य राहतील तसेच महिलांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व शौचालये कायमस्वरुपी स्वच्छ व नीटनेटके राहतील अशा प्रकारे दैनंदिन निगा व देखभाल राखण्यात यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. शौचालय हे आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे शौचालय नियमितपणे स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अस्तित्वातील व नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व शौचालयांच्या कामात काही उणीवा असल्यास आवश्यक उपाययोजना तातडीने करणे, प्रत्येक शौचालयावर पाण्याची टाकी आणि नळ बसविण्यात यावे. या टाक्यांमध्ये नियमित पाणी असेल याची खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या. स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण ९८ कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. एकूण ८२१ शौचालयांच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव असून या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतील प्रत्येक रुपया हा संपूर्णत: त्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे असा सूचक इशाराही त्यांनी बैठकीत दिला. शौचालयात विदारक परिस्थती आढळून आल्यास किंवा याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत वॉटरप्लस मानांकन स्पर्धेत ठाणे महापालिका सहभागी होत आहे. ठाणे शहराला वॉटरप्लस मानांकन प्राप्त होण्यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये चोवीस तास पाण्याच्या उपलब्धतेसाठी टाक्या बसविणे, शौचालयात नळ असणे, कडी कोयंडे सुस्थितीत असणे, शौचालयात पुरेशा प्रमाणात उजेड तसेच विजेची व्यवस्था असणे, दिव्यांगांना वापरण्यायोग्य अशी शौचालयांची रचना असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने शौचालयाची दुरूस्ती किंवा नवीन शौचालये बांधण्यात यावीत. प्रत्येक शौचालयात वापरण्यात येणारी साधने ही गुणवत्तापूर्वक असलीच पाहिजे याचीही खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Story img Loader