लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर: माळशेज घाटात पावसाळी धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी जात असाल तर तुमचा हिरमोड होणार आहे. कारण पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पुढील दीड महिना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात धोकादायक पर्यटनस्थळांवर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातून यासंबंधीचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे. यासह जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे, मुंबई आणि उपनगरातील पर्यटकांना ठाणे जिल्ह्यातील निसर्गसंपदा खुणावत असते. माळशेज घाट, घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, हिरवेगार डोंगर आणि परिसराला पर्यटक पसंती देत असतात. जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, शहापूर या भागातही अनेक नद्या, नैसर्गिक नाले, लहान मोठे धबधबे आहेत.
आणखी वाचा-ठाणे: घोडबंदर मार्गावर भीषण अपघात, कंटेनर चालकाचा मृत्यू
बदलापुरजवळ कोंडेश्वर कुंडालाही पर्यटकांची पसंती असते. मात्र अतिउत्साही पर्यटकांचे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू होतात. तीनच दिवसांपू्र्वी बदलापुरजवळील कोंडेश्वरात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला होता. अशा धोकादायक पर्यटन स्थळांवर दुर्घटना टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा पर्यटनस्थळांवर पर्यटनकांना बंदी आदेश जाहीर करत असते. यंदाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमतीपणे ३० जून ते ३० ऑगस्ट या काळात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मनाई आदेश जाहीर करण्यात आले असल्याची माहिती टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे माळशेज घाटाकडे पर्यटकांना जाता येणार नाही. आम्ही पर्यटकांना आदेशाची माहिती देत त्यांच्यात जनजागृती निर्माण करत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच धोकादायक ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर असे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे श्रावणाच्या आधीच्या तयारी आणि त्यापूर्वीच्या शेवटच्या शनिवार आणि रविवारी माळशेज किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या निसर्ग पर्यटनस्थळांना भेट देण्याची तयारी करत असलेल्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, शहापुर तालुक्यातील माहुली गड, कसारा घाट. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, कल्याण तालुक्यातील खडावली नदी आणि अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा ही तालुक्यातील महत्वाची तसेच इतरत्र पावसाळयात गर्दी होणारी स्थळे यांच्या यात समावेश आहे.
आणखी वाचा-VIDEO : सतर्क तिकीट तपासनीसामुळे वाचले महिलेचे प्राण; अंबरनाथ स्थानकातील घटना
मनाई आदेश असणारी ठिकाणे
ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा, कल्याण तालुक्यातील कांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी, मुरबाड तालुक्यातील सिध्दगड, डोंगरन्हावे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम, माळशेज घाटातील सर्व धबधबे, माळशेज घाट, पळु, खोपवली, गोरखगड, सिंगापुर, नानेघाट, धसई डॅम, आंबेटेबे-मुरबाड, भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर (वज्रेश्वरी) शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारा, कळंबे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट, अंबरनाथ कोंडेश्वर धबधबा, धामणवाडी, तारवाडी, भोज, व-हाडे, दहिवली, मळीचीवाडी.