आधुनिकीकरणामुळे जीवनशैली बदलत जाते. इतर गोष्टींप्रमाणेच खाद्यसंस्कृतीवरही त्याचे परिणाम होत असतात. आता खाणे म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. आर्थिक उत्पन्न वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबाची क्रयशक्ती वाढली आणि त्याने खानपानाच्या सवयी बदलल्या. त्याला थोडा नावीन्याचा स्पर्श होऊ लागला. साधा बटाटावडय़ाची आपली महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती चक्क ओरियंटलपर्यंत जाऊन पोहचली. ‘आमची कुठेही शाखा नाही’ ही अभिमानाची नाही तर संकुचितपणाची भावना आहे, हे मराठीजनांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळेच आता अस्सल मराठमोळे पदार्थ जगभरात मिळू लागले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडच्या पारंपरिक पदार्थानीही पाश्चात्त्य शैली आत्मसात करण्यास सुरुवात केली. ठाणे-डोंबिवली परिसरात या बदलत्या खाद्यसंस्कृतीच्या खुणा पाहायला मिळतात. डोंबिवलीतील ‘ओ-मराठी’ त्यापैकी एक. खवय्यांच्या जिभेची बदललेली चव लक्षात घेऊन मराठी खाद्यपदार्थाना ग्लॅमरस असा ओरियंटल तडका देण्याचा प्रयत्न ‘ओ-मराठी’चे संचालक सचिन बोडस यांनी केला. त्यांचा हा प्रयोग आता डोंबिवलीकरांच्या पसंतीस पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

थालीपीठ पिझ्झा

थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड असला तरी त्यांच्या फर्मास सुगंधाने त्याच्या प्रेमात पडायला होतं. थालीपीठ या मराठी खाद्यपदार्थाने सर्वानाच वेड लावले आहे. सध्या पाश्चिमात्य खाद्याच्या आहारी गेलेली तरुण पिढी मात्र आपल्या अमूल्य ठेव्याकडे पाठ फिरवताना दिसून येते. त्यासाठी डोंबिवलीतील सचिन बोडस यांनी मराठी खाद्यपदार्थाना ओरियंटल चव देऊन तरुण पिढीला आकर्षित करण्याचा एक छोटा प्रयोग ‘ओ-मराठी’ या खाऊ कट्टय़ापासून सुरू केला आहे.

पाश्चिमात्य खाद्यपदार्थामधील पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थाना लहान मुले, महाविद्यालयीन तरुण अधिक पसंती देतात. त्यासाठी खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाला पिझ्झाचे रूप देण्यात आले आहे. या चविष्ट समीकरणाने पदार्थाची चव शतपटीने वाढली आहे.  डोंबिवलीकरांच्या जिव्हेला ही चव चांगलीच पसंत पडली आहे. आठ ते नऊ धान्यांच्या भाजणी पीठापासून तयार झालेले थालीपीठ पिझ्झा बेस(ब्रेड) म्हणून वापरले जाते. त्यावर घरगुती मसाल्यांपासून तयार केलेला रेड सॉस, भाज्या आणि सर्वाच्या आवडीचे चीज पांघरून खवय्यांसाठी खास ‘थालीपीठ पिझ्झा’ उपलब्ध आहे. हा पिझ्झा खाण्यासाठी डोंबिवलीतील तरुण, लहान मुलेच नव्हे तर आजी-आजोबाही रांग लावताना दिसून येतात.  चुरचुरीत-झणझणीत चवीची चर्चा तर येथील प्रत्येक मराठी कुटुंबात होताना दिसून येते.

शेजवान चीझ बटाटेवडा..

मुंबईच्या रस्त्यापासून ते जगभरातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला मराठी माणसाच्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेला मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे ‘बटाटावडा’. परंतु पिझ्झा, बर्गरच्या गर्दीत हा मराठमोळा बटाटावडा मागे पडतोय की काय, अशी भीती काही वेळा निर्माण होते. मात्र सर्वसमावेशक संस्कृतीचा भाग म्हणून बटाटावडय़ाने आपली ओळख कायम ठेवत थोडा वेगळा अवतार धारण केला आहे. चवीमध्ये थोडेफार बदल करून खवय्यांसाठी ओ-मराठीच्या या शेजवान चीझ वडय़ाने अक्षरश खवय्यांच्या जिभेचा ताबा घेतला. या शेजवान वडय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात शेजवानच्या चटणीचा फार वापर केलेला नाही. वडय़ाच्या भाजीत कोणताही बदल न करता फक्त वरील आवरणाला शेजवानची हलकी चव देण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या अवतारातही बटाटावडय़ाची अस्सल चव कायम ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर मायोनिजचा वापर करून तयार करण्यात आलेला ‘मायो वडा’ही खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच वाटाण्याची करंजी, केळ्याचा वडा यांसारखे पदार्थ तसेच मोदकाचे बदललेले रूप येत्या काही दिवसांमध्ये खाद्यप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे.

मराठमोळी शीतपेये 

कोणतेही सत्त्व नसलेली कोल्ड ड्रिंक्स त्यातील हानिकारक रासायनिक घटकांमुळे आरोग्याला हानिकारक असतात. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून अस्सल देशी शीतपेये आता अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. ‘ओ मराठी’मध्येही आपण त्यांचा आस्वाद घेऊ शकतो. विशेष म्हणजे कोकम सरबत, वाळ्याचे सरबत, लिंबू सरबत आदी पेय स्वतंत्रपणे तसेच त्यांचे मॉकटेल्सही उपलब्ध आहेत.

मराठी’,

बोडस मंगल कार्यालयाशेजारी, राम नगर, मालविया रोड, डोंबिवली (पू.) सकाळी ९ ते दुपारी १. संध्याकाळी ५ ते रात्री ९. बुधवार बंद .

किंमत- १० रुपये ते ६० रुपये