भिवंडी शहरातून उद्या, रविवारी ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात येते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेले हे बदल उद्या दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत असणार आहेत. अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> पुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Pushkar Singh Dhami
Uttarakhand : डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय
Elon Musk interferes in politics around the world
अमेरिकेपाठोपाठ जर्मनी, ब्रिटनच्या राजकारणातही इलॉन मस्कची लुडबूड? युरोपला उजव्या वळणावर नेण्याची योजना?
Tourists, Khandala Lonavala hill stations traffic jam
नववर्ष स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; लोणावळा, खंडाळ्यात ठिकठिकाणी कोंडी

तर कॉटरगेट मस्जिद-रामभवन हॉल-चाँदतारा मस्जिद, बुबेरे हॉटेल-पटेल मस्जिद उजव्या बाजुने पांजरपील चौक मार्गे वंजारपाटी नाका ममता हॉस्पिटलच्या बाजूने डावीकडे मामा भांजा दर्गा या मार्गावरून मिरवणूक निघणार आहे. यामुळे मिरवणूक मार्गावर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

असे आहेत वाहतूक बदल

वाडा रोड मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तर या जड – अवजड वाहनांना अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईने मार्गे इच्छित स्थळी जात येणार आहे. वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून यातून हलक्या वाहनांना पारोळ फाटा येथून खोणीगांव, तळवली फाटा, कांबारोड मार्गे वसई रोड येथून कारीवली मार्गे अथवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगांव मार्गे इच्छित स्थळी पोहचता येणार आहे.

हेही वाचा >>> कल्याण मध्ये सोनाराची कारागिराकडून फसवणूक

वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एसटी बससह धामणगांव, जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तर ही वाहने धामणगांव पाईपलाईन मार्गे वाड्याकडे जातील. तसेच एस. टी. बसमधील प्रवासी चाविंद्रा जकात नाका या ठिकाणी उतरवतील व तेथून प्रवाशी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जात येणार आहे.

ठाणे, कल्याणकडून जुना ठाणे आग्रा रोडने वाडा बाजूकडे व चाविंद्रा मार्गे नाशिकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बागेफिरदोस मस्जिद पेट्रोल पंप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. तर या मार्गे जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंप येथून नागाव रोडने जात येणार आहे.

राजनोली चौकातून भिवंडी शहरात येणाऱ्या एस.टी., के.डी.एम.टी. बस, जड अवजड वाहने, कार, रिक्षा, दुचाकी, मध्यम व हलक्या वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. तर एस.टी., के. डी.एम.टी. बसेस, शिक्षा या रांजनोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथूनच प्रवाशी घेऊन इच्छित स्थळी जाता येणार आहे. तसेच जड-अवजड, मध्यम व हलकी वाहने राजनोली नाका येथून मुंबई-नाशिक बायपास हायवे वरील मानकोली नाका येथून अंजुर फाटा, वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका कामतघर किंवा पाईपलाईन मार्गे जातील.

Story img Loader