घोडबंदर मार्गावरील नागलाबंदर परिसरात मेट्रो मार्गिकेच्या खांबावर तुळई बसविण्यात आले असून या कामामुळे मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर २३ मार्चपर्यंत दररोज रात्री १२ ते पहाटे चार वाजतेपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करण्याचा तर हलक्या वाहनांची वाहतूक नागलाबंदर येथील सेवा रस्ता मार्गे सुरू ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कशेळी-काल्हेर आणि अंजूरफाटा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार असून यामुळे या पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पुढील चोवीस तास बंद राहणार

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

घोडबंदर मार्गावरून जड-अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्याप्रमाणात होत असते. या मार्गावर घाटकोपर ते गायमुख या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या मार्गिकेवरील नागलाबंदर परिसरात मेट्रोच्या खांबावर तुळई बसविण्याचे काम बुधवार रात्रीपासून हाती घेण्यात आले आहे. रात्रीच्यावेळेत घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असते. तुळई बसविण्याचे काम रात्रीच्या वेळेत करण्यात येत असून या कामामुळे मार्गावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल लागू केले आहेत. गुरुवार, २३ मार्चपर्यंत दररोज रात्री १२ ते पहाटे चार वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. या बदलानुसार अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आली असून ही वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

असे आहेत वाहतूक बदल

मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने माजिवडा पूल येथून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे किंवा कापूरबावडी जंक्शन येथून बाळकूम, कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनाना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिक येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने मानकोली पूलाखालून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. हलकी वाहने नागलाबंदर सेवा रस्ता येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करतील.