जाणून घ्या कसे असतील पर्यायी मार्ग आणि वाहतुकीतील बदल

ठाणे: दिवाळी पहाट निमित्ताने सोमवारी तलावपाली, नौपाडा, गोखले रोड परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. त्यामुळे परिसरातील पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावपाली परिसरात दरवर्षी खासदार राजन विचारे यांच्यातर्फे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवाळी पहाट कार्यक्रमास ठाणे, कल्याण, डोंबिवली भागातून अनेक महाविद्यालयीन तरूण-तरूणी येत असतात. शिवसेनेत फूट पडल्याने यावर्षी न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाला या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा करण्यास परवानगी मिळाली आहे. यावर्षीही गर्दी होऊन कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या मार्गावर पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.

Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
contractors warn to stop work for rs 90 thousand crores outstanding of development works during the election period
निवडणूक काळातील विकासकामांची ९० हजार कोटींची थकबाकी; कामे थांबविण्याचा ठेकेदारांचा इशारा
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
UCC
UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये आजपासून लागू झाला समान नागरी कायदा, आता नेमकं काय बदलणार?
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या दिरंगाई कारभारामुळे शहराचे विद्रुपीकरण; आमदार संजय केळकर यांचे पालिकेच्या कारभारावर ताशेरे

असे आहेत वाहतूक बदल

प्रवेश बंद : डॉ. मुस चौकाकडून गडकरी रंगायतन चौकाच्या दिशेने वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : येथील वाहने डॉ. मुस चौकातून टॉवर नाका टेंभीनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :  गडकरी रंगायतन जवळील चौकातून डॉ. मुस चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : येथील वाहने गडकरी चौक येथून अल्मेडा चौक, वंदना सिनेमा, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरीनिवास चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : घंटाळी, साईनाथ चौक येथून गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना श्रध्दा वडापाव, घंटाळी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : येथील वाहने घंटाळी चौकातून घंटाळी देवी मंदीर पथ मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : गजानन चौक ते तीन पेट्रोल पंप येथील काका सोहनी पथ, गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गाडगीळ चौका प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : येथील वाहने तीन पेट्रोल पंप, हरीनिवास  चौक किंवा घंटाळी रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद : राजमाता वडापाव दुकान येथून गजानन महाराजचौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना राजमाता वडापाव दुकानाजवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : येथील वाहने राजमाता वडापाव सेंटर येथून गोखले रोडने इच्छित स्थळी जातील.

Story img Loader