गणेश विसर्जन निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहर म्हणजेच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. एक, चार, पाच सहा आणि नऊ सप्टेंबर या दिवशी दुपारी ते रात्री गणेश विसर्जन संपेपर्यंत हे बदल लागू असणार आहे.गणेश विसर्जन निमित्ताने ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात शेकडो मिरवणूका निघत असतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरात वाहतूक बदल पोलिसांनी लागू केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका नगर अभियंत्यांना इशारा
असे आहेत वाहतूक बदल ठाणे शहरातील वाहतूक बदल
गुजरात, वसई आणि घोडंबदर येथून घोडबंदर मार्गे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटीनाका,फाऊंटन आणि गायमुख येथे प्रवेशबंदी असेल. सर्व जडअवजड वाहने चिंचोटी नाका, कामण, भिवंडी, मानकोली मार्गे वाहतूक करतील.
नवी मुंबई येथून विटावा, कळव्याच्या दिशेने वाहतूक करणारी जड वाहने, खासगी बसगाड्या, एसटी, टीएमटी, एनएमएमटीच्या बसगाड्यांना विटावा जकातनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने एेरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर येथून पूर्व द्रुतगती महामार्गे इच्छितस्थळी जातील. तर बसगाड्यांतील प्रवाशांचा प्रवास विटावा जकातनाका येथे समाप्त होईल.
हेही वाचा >>> भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टा ; उल्हासनगर शहरातून एकाला अटक
गोल्डन डायज नाका येथून मीनाताई ठाकरे चौक, कळव्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड- अवजड वाहनांना गोल्डन डायज नाका येथे प्रवेशबंद असेल. ही वाहने कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, कोपरी पूल मार्गे वाहतूक करतील.
खारेगाव टोलनाका येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका येथून पुढे वाहतूक करतील.
शिळफाटा येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने शिळफाटा येथून रबाळे, एरोली पूल, कोपरी मार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतील.
मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथून पारसिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या एसटी, टीएमटी, खासगी बसगाड्यांना पारसिक, खारेगाव नाका येथे प्रवेशबंदी असेल. या बसगाड्यांतील प्रवाशांचा प्रवास पारसिक नाका येथे समाप्त होईल.
साकेत पूलावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना गोल्डन डायज नाका येथे प्रवेशबंद असेल. ही वाहने कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, कोपरी मार्गे वाहतूक करतील.
मॉडेला चेकनाका येथून रोड नं. १६ आणि वागळे इस्टेट येथे जाणाऱ्या टीएमटी बसगाड्यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना सिंधुदुर्ग हॉटेल येथून मुख्य रस्त्याने ( स. गो. बर्वे मार्गाने) जाण्यास प्रवेश बंदी असेल. वाहने सिंधुदुर्ग उपाहारगृह येथून डावीकडे वळून जगदाळे ट्रान्सपोर्ट, शांताराम चव्हाण मार्गाने एमआयडीसी येथे डावीकडे वळून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
वागळे इस्टेट, रोड नं. १६ येथून मॉडेला नाक्याकडे जाणाऱ्या बसगाड्यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना पेट्रोल पंप येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने वागळे इस्टेट, रोड नं. १६ कडुन मॉडेला नाका मुंबईकडे जाणारी वाहने रोड नं. १६ येथून कामगार रुग्णालय येथून जातील.
चेक नाका मार्गे तिनहात नाका येथे जाणाऱ्या बेस्ट बसगाड्यांना मॉडेला चेक नाका येथे प्रवेश बंदी असेल. या बसगाड्या मुलुंड चेक नाका येथेच प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेवून परत मुंबईत जातील.
विष्णुनगर, सोपान चौक, राम मारूती रोड, मासुंदा तलाव मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नमस्कार उपाहारगृह येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने राम मारूती रोडने, गावदेवी बस थांब्यावरून पुढे शिवाजी महाराज पथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातील.
हेही वाचा >>> ठाणे : १ लाख ४० हजार गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना
ठाणे रेल्वे स्थानक येथून गावदेवी मार्गे शिवाजी महाराज पथ, मिनाताई ठाकरे चौक आणि कळव्याच्या दिशेने जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना गावदेवी येथे प्रवेशबंदी आहे. ही वाहने ठाणे रेल्वे स्थानक येथून गोखले रोड, घंटाळी चौक, तीन पेट्रोल पंप, मिनाताई ठाकरे चौक किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जातील.
चरई भागातून व वीर सावरकर रोडने गडकरी चौक येथे येण्यास सर्व वाहनांना हॉटेल कोल्हापुर येथे प्रवेशबंदी करण्यात येत आहे. हलकी वाहने वीर सावरकर रोड, भवानी चौकातुन कोर्टनाका येथून इच्छित स्थळी जातील.
कळवा येथून टेंभीनाका मार्गे स्थानक परिसरात जाणाऱ्या सर्व वाहनांना विश्राम गृहासमोरील चौकात प्रवेश बंद आहे. ही वाहने खारटन रोडने किंवा दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह, बाजारपेठ मार्गे जातील.
कोपरी चौक, आनंद सिनेमा, ठाणे रेल्वे स्थानक पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व बसगाड्यांना प्रवेश बंदी असेल. कोपरी चौक येथे प्रवाशी उतरतील.
कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक बदल.
मुरबाड रोड, महात्मा फुले चौक, मोहमद अली रोड, शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, घेला देवी चौक, दुधनाका, पारनाका, लो. टिळक चौक, अहिल्यादेवी चौक, गणपती चौक, तेलवणे रुग्णालय, लाल चौक, दुर्गा माता चौक या मार्गावर मिरवणूक असल्याने येथे वाहतूक बदल लागू असतील.
कल्याण शहरातील अंतर्गत मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी असेल.
वाडा रोडने भिवंडी शहराकडे वाहतूक करणाऱ्या अवजड आणि हलक्या वाहनांना अंबाडीनाका आणि नदीनाका येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गे किंवा खोणीगाव येथून वाहतूक करतील.
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी, अंबरनाथ पूर्व रोटरी क्लब, शिवाजी चौक स्वामी समर्थ चौक, हुतात्मा चौक, अंबरनाथ रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाणारी जड- अवजड वाहने व बसगाड्यांना आनंदनगर एमआयडीसी पेट्रोलपंप येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. बसगाड्यांतील प्रवासी हुतात्मा चौक येथे उतरतील.