पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलावर तुळई बसविली जाणार आहे. या कामामुळे शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ वाजतापर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कोपरी पूलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा >>>बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जमीन मोबदला प्रक्रियेत घोटाळा ; मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांचा आरोप
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मुख्य पूलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून शनिवारपासून सोमवारपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर तुळई बसविली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद ठेवली जाणार असून येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ वाजतापर्यंत आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.
हेही वाचा >>>“महाराष्ट्राची दिल्लीत चालते, तर रॉकेटचे…”, ‘एअर बस’वरून जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीसांना टोला
वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे
जड अवजड वाहनांकरीता
प्रवेश बंद – नाशिक मुंबई महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा महापे मार्गे रबाळे-ऐरोली पूल येथून मुंबईत इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – घोडबंदर मार्गे कोपरी पूल, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजिवडा पूलावर आणि पूला खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – ही वाहने माजिवडा, खारेगाव टोलनाका, गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे, रबाळे -ऐरोली पूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा >>>ठाणे : जिल्ह्यात रेती लिलाव निविदेचे सोपस्कारही बंद ?
हलक्या वाहनांकरीता
प्रवेश बंद – नाशिक, घोडबंदर मार्गे तसेच ठाणे शहरातून कोपरी पूल मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना तीन हात नाका पूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – नाशिक येथील वाहने साकेत मार्गे, कळवा-विटावा-ऐरोली मार्गे मुंबईत जातील.
पर्यायी मार्ग – ठाणे शहरातील वाहने टपाल कार्यालय, मध्यवर्ती कारागृह मार्ग, कळवा-विटावा-ऐरोली मार्गे-ऐरोली पूल मार्गे जातील.
हेही वाचा >>>कल्याण : राज्य-जिल्हा यंत्रणेत एकमत नसल्याने आदिवासी विकासाची ठक्कर बाप्पा योजना ठप्प
किंवा
पर्यायी मार्ग – तीन हात नाका येथून एल. बी. एस. रोडने मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईत जातील.
किंवा
पर्यायी मार्ग – तीन हात नाका, तुळजा भवानी मंदिर सेवा रस्ता,
बारा बंगला, आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईच्या दिशेने जातील.