लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : दिवाळी येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत असते. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी बाजारपेठ परिसरात उद्या, रविवारपासून वाहतूक बदल लागू केले आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडीचा सामना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

दिवाळी निमित्ताने दरवर्षी ठाणे बाजारपेठेत ठाणे शहरातील विविध भागातून नागरिक गर्दी करत असतात. येथील रस्ते अरुंद आहेत. बाजारपेठेतून सर्वाधिक वाहतूक टीएमटी, राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांची वाहतूक होत असते. बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी बाजारपेठे मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविली आहे.

आणखी वाचा-मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन

असे आहेत वाहतूक बदल

  • जांभळीनाका येथून बाजारपेठत वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळीनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टॉवर नाका, मार्गे वाहतुक करतील.
  • खारकर रोड येथून बाजारपेठेत वाहतूक करणाऱ्या वाहनांना महाजनवाडी सभागृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने महापालिका व्यायामशाळा, एन.के.टी. महाविद्यालय, कोर्टनाका मार्गे वाहतूक करतील.
  • ठाणे ट्रेडर्स येथून महमद अली रोड येथून जांभळीनाका मार्गाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या (दुचाकी वगळून) वाहनांना ठाणे ट्रेडर्स येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने महागिरी मशीद येथून वाहतूक करतील.
  • दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह मार्गावरून बाजारपेठेच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना जवाहर बाग येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने अग्निशमन केंद्र येथून राघोबा शंकर रस्ता मार्गे वाहतूक करतील.
  • स्थानक परिसरातील अशोक सिनेमा आणि नॅशनल इलेक्ट्रिक्स येथून बाजारपेठेत वाहतूक करणाऱ्या वाहनांना (दुचाकी वगळून) माटे चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दत्त मंदिर, सिडको मार्गे वाहतूक करतील.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes in thane market area from sunday mrj